गजा मारणे टोळीतील दोघांसह 18 गुन्हेगार तडीपार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पुणे - कुख्यात गजा मारणे टोळीतील दोघांसह 18 सराईत गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे - कुख्यात गजा मारणे टोळीतील दोघांसह 18 सराईत गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

गेल्या वर्षभरात परिमंडळ एकच्या हद्दीतील 25 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. महापालिका निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी गेल्या महिन्यात 18 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. तडीपारीचा हा कालावधी सहा महिने ते दोन वर्षांसाठी राहील. येत्या काही दिवसांत चार टोळ्यांतील गुन्हेगारांना तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्‍त हिरेमठ यांनी सांगितले. 

पंकज सुरेश वांभिरे (वय 24, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड), आसिफ ऊर्फ मन्या ऊर्फ मनोज जहॉंगीर शेख (वय 26, रा. पुलाची वाडी, डेक्‍कन), नरेंद्र महादेव बलकवडे (वय 24, रा. सातचाळ, गणेशनगर, एरंडवणे), शब्बीर ऊर्फ मलिक जहॉंगीर शेख (वय 28, रा. वनदेवी मंदिराजवळ, कर्वेनगर), विक्‍की गेंदालाल करझळे (वय 21, रा. रामनगर, वारजे), अक्षय दत्तात्रेय फाळके (वय 21, रा. वडार वस्ती, कर्वेनगर), अक्षय श्‍याम जाधव (वय 19, रा. वडारवाडी), दीपक पिलाजी साळुंके (वय 26, रा. कासेवाडी, भवानी पेठ), अफाख अन्सार खान (वय 20, रा. रविवार पेठ), बबन ऊर्फ आरबाज इक्‍बाल शेख (वय 19, रा. भवानी पेठ), गणेश लक्ष्मण धुमाळ (वय 24, रा. म्हातोबानगर, कोथरूड), मनोज ज्ञानोबा कांबळे (वय 22, रा. रामनगर, वारजे), अभिजित ऊर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय 19, रा. यशोदीप चौक, वारजे), सनी ऊर्फ नाज्या वसंत कांबळे (वय 27, रा. पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ), उमेश वसंत जंगम (वय 20, रा. लोखंडे तालीमजवळ, नारायण पेठ), पप्पू ऊर्फ अविनाश वसंत कडू (वय 33, रा. म्हातोबानगर, कोथरूड), संतोष नारायण गिरी (वय 26, रा. म्हाडा वसाहत, वारजे माळवाडी) आणि सागर ऊर्फ चिंग्या गौतम सोनकांबळे (वय 31, रा. मंगळवार पेठ) अशी तडीपार गुन्हेगारांची नावे आहेत. 

Web Title: 18 criminals banished