पिंपरीत १८ शाळा अनधिकृत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पिंपरी - शहरात अनधिकृत १८ शाळा सुरू असून तेथे प्रवेश घेऊ नये, असे आवाहन महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले आहे. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास पाल्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

पिंपरी - शहरात अनधिकृत १८ शाळा सुरू असून तेथे प्रवेश घेऊ नये, असे आवाहन महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले आहे. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास पाल्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

शहरात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात खासगी प्राथमिक शाळांनी सरकारची कोणतीही परवानगी न घेता वरील शाळा चालविल्या जात आहेत. संबंधित संस्थांना शाळा बंद करण्याबाबत नोटीस दिल्या आहेत. १८ पैकी एक मराठी व उर्वरित इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. संबंधित अनधिकृत शाळांवर १९ ऑक्‍टोबर २०१० अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, काही शाळांची प्रवेशप्रक्रिया मे महिन्यात पूर्ण होते. शाळा सुरू होण्यास अवघे चार दिवस राहिले आहेत. शिक्षण विभागाने मे महिन्यातच अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करणे गरजेचे होते.

अनधिकृत शाळा
 ग्रॅंड मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, मोशी 
 स्मार्ट इंग्लिश मीडियम स्कूल, प्राधिकरण- मोशी 
 इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूल, साई पार्क, दिघी 
 बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, मोशी  
 मास्टर केअर इंग्लिश मीडियम स्कूल, आळंदी रस्ता, भोसरी 
 ग्रॅंड मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, चिखली
 जयश्री इंग्लिश मीडियम स्कूल, चऱ्होली 
 मरिअम इंग्लिश मीडियम स्कूल, भोसरी 
 ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी 
 बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी
 सेंट मेरीज ज्युनिअर प्रायमरी स्कूल, पिंपळे निलख
 माउंट कारमल पब्लिक स्कूल, सांगवी 
 शुभंकरोती इंटरनॅशनल स्कूल, गांधीपेठ, चिंचवड
 एंजल्स स्कूल, पिंपळे निलख 
 मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी
 ब्ल्यू रोज इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड 
 पर्ल ड्रॉप स्कूल, पिंपळे निलख (सर्व इंग्रजी माध्यम)
 बालगोपाळ माध्यमिक शाळा, पिंपरी (मराठी माध्यम)

Web Title: 18 school illegal in pimpri