पुणे : १८ हजारांहून अधिक होर्डींग, फ्लेक्सवर कारवाई

साडेआठ लाखांचा दंड वसूल, जागा मालकांच्या मिळकतीवर १४ लाखांचा बोजा
18000 hoardings flex action Pune Municipal Corporation takes action against illegal encroachers
18000 hoardings flex action Pune Municipal Corporation takes action against illegal encroacherssakal

पुणे : महापालिकेकडून बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांविरुध्द कारवाई सुरू असून, गेल्या दहा दिवसांत १८ हजार २३ अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर काढण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डींगधारकांकडून दीड लाख रुपये आणि बोर्ड, बॅनर, पोस्टर लावणाऱ्यांकडून सात लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.अनधिकृत होर्डिंग काढल्यानंतर त्यापोटी ५० हजार रुपये इतका दंड संबंधित जाहिरात फलकधारकाकडून वसूल करण्यात येतो. दंड मुदतीत न भरल्यास जागा मालकाकडून दंड वसूल करण्यात येतो.

जागा मालकाने दंड न भरल्यास त्यांच्या मिळकतीवर दंडाच्या रक्कमेचा बोजा चढविण्यात येतो. त्यानुसार २९ जागा मालकांच्या मिळकतीवर १४ लाख ५० हजार रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. निनावी होर्डींग काढल्यानंतर जाहिरात फलकाचे साहित्य जप्त करण्यात येते. त्यानुसार अद्यापपर्यंत सुमारे दीड हजार किलो लोखंड साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

पाच जणांवर गुन्हे दाखल

अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, झेंडे इ. लावणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ५३ जणांविरुध्द तक्रार दिली आहे. आत्तापर्यंत पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दहा दिवसांतील कारवाई

  • होर्डिंग ४

  • बोर्ड ३७४८

  • बॅनर ३५२०

  • फ्लेक्स १५७७

  • झेंडे १०६९

  • पोस्टर ४६४८

  • किऑक्स १५०६

  • साइड व फ्रंट मार्जिनमधील नामफलक १९५३

डेक्कन परिसरात कारवाई

डेक्कन परिसरात एफसी रोड आणि आपटे रोड येथील अतिक्रमणांच्या विरोधात महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली. काही व्यावसायिकांनी दुकानांसमोर केलेली अतिक्रमणे आणि होर्डिंगच्या आसपासची अतिक्रमणे कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आली. या वेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com