गांजा वाहून नेणारे वाहन पाठलाग करून पकडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

पुणे/औंध - भरधाव व सिग्नल तोडून पळालेल्या वाहनातून १४ लाख ५६ हजार रुपये किमतीचा १८२ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला असून, चालकाला अटक केली आहे. 

राजेंद्र उत्तम रोकडे (रा. नायगाव सोरतापवाडी, ता. हवेली, सध्या दोनवत, ता. खालापूर, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चतुःशृंगी वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी किसन शिंगे हे शनिवारी सायंकाळी ब्रेमेन चौक येथे वाहतुकीचे नियमन करत होते. त्या वेळी विद्यापीठ रस्त्याने आलेली मोटार भरधाव ब्रेमेन चौकातील सिग्नल तोडून पुढे निघून गेली. त्या वेळी त्यांनी पुढील चौकात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला ती मोटार थांबविण्यास सांगितले. मात्र, तिथेही ती थांबली नाही. तसेच ती भरधाव सांगवीच्या दिशेने निघाली. त्या वेळी चतुःशृंगी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त कार्यालयाजवळील सिग्नल सुटल्याने तेथे वाहनांची गर्दी झाली. त्यामुळे ती मोटार थांबली. त्यानंतर ती मोटार गर्दी कमी झाल्यावर पुढे निघाली. किसन शिंगे यांनी आणखी एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन मोटारीचा पाठलाग केला. त्यानंतर मोटार औंध गाव रस्त्यावरील मशिदीजवळ पकडली. मागोमाग इतर कर्मचारीही तेथे आले. त्यानंतर मोटार औंध गाव पोलिस चौकी येथे नेण्यात आली. तेथे मोटारीची पाहणी केली असता, मागच्या सीटखाली खाकी रंगाच्या ९३ पाकिटांमध्ये काहीतरी बांधलेले दिसून आले. त्यात गांजा असल्याचे समोर आले. या पाकिटांचे वजन केले असता, एकूण १८२ किलो गांजा असल्याचे दिसून आले. त्याची किंमत १४ लाख ५६ हजार रुपये आहे. 

Web Title: 182 kg of drugs police seized