योग चॅंपियनशिपमध्ये भारताला 19 पदके

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

पुणे - अर्जेंटिना येथे पार पडलेल्या योग चॅंपियनशिप २०१८ या जागतिक स्पर्धेत भारतीय संघाने १९ पदकांची कमाई केली. त्यामध्ये १२ सुवर्ण, ३ रौप्य, ४ ब्राँझपदकांचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ९ पदके मिळवली. त्यामध्ये ५ पदके  पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंना मिळाली. 

योग फेडरेशन ऑफ अर्जेंटिनातर्फे २६वी योग चॅंपियनशिप २०१८ ही जागतिक स्पर्धा ६ मे रोजी आयोजित केली होती. योग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अशोककुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला. 

विविध प्रकारांमध्ये देवदत्त भारदे याने सुवर्ण, रौप्य, ब्राँझ अशी तिन्ही पदके मिळवली; तर तृप्ती अवताडेने सुवर्ण, रौप्य अशी दोन पदके मिळवली. श्रेया खंदाडे, श्रद्धा मुंदडा, धनश्री लेकुरवाळे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. भारतीय संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे, महाराष्ट्र योग असोशिएनचे अध्यक्ष संत प्रेमानंद महाराज आणि कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Web Title: 19 medal in yog championship competition