इंदोरीच्या तरुणाचा माळवाडीत कोयत्याने वार करुन खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

तळेगाव - तळेगाव-चाकण रस्त्यालगत माळवाडी येथे इंदोरीतील युवकाचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. रोशन उर्फ ढंप्या बाळू हिंगे(१८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज बुधवारी (ता.२८) सकाळी पावणेनऊच्या सुमारास रोशन दुचाकीवरुन रस्त्याने जात असताना, पाठीमागून आलेल्या एका मारुती ८०० गाडीने दुचाकीला धडक देऊन ,त्याला खाली पाडले. त्यानंतर तो पळत असताना त्याचा पाठलाग करत कोयत्याने सपासप वार करुन खून करण्यात आला. घटनेनंतर थोड्याच वेळात वॅगनआर कारमधून आलेल्या काही युवकांनी त्याला त्वरित तळेगाव आणि नंतर सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

तळेगाव - तळेगाव-चाकण रस्त्यालगत माळवाडी येथे इंदोरीतील युवकाचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. रोशन उर्फ ढंप्या बाळू हिंगे(१८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज बुधवारी (ता.२८) सकाळी पावणेनऊच्या सुमारास रोशन दुचाकीवरुन रस्त्याने जात असताना, पाठीमागून आलेल्या एका मारुती ८०० गाडीने दुचाकीला धडक देऊन ,त्याला खाली पाडले. त्यानंतर तो पळत असताना त्याचा पाठलाग करत कोयत्याने सपासप वार करुन खून करण्यात आला. घटनेनंतर थोड्याच वेळात वॅगनआर कारमधून आलेल्या काही युवकांनी त्याला त्वरित तळेगाव आणि नंतर सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. 

याप्रकरणी रोशनचा मित्र सुनील कैलास कदम (१९) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याची माहिती माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, हवालदार अनिल भोसले यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचत, सीसीटीव्ही फुटेज घेतले. तसेच प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेऊन तपास चालू केला. 

सकाळीच भरवस्तीत एवढ्या भयानक पद्धतीने खून करण्यात आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. सदर घटनेमागे इंदोरीतील गतकाळातील गुन्हेगारी घटना आणि पूर्ववैमनस्य आदींचा काही संबंध आहे का?याची शक्यता पोलिस तपासून पाहत आहेत.

Web Title: 19 yat boy stabbed to death in a malwadi pune with a knife