लोहगावमध्ये प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय मुलीचा खून

लोहगावमध्ये प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय मुलीचा खून

विश्रांतवाडी - लोहगावमध्ये प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय तरुणीला भेटायला बोलावून तिच्याच ओढणीने गळा आवळून तिचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत उमा बबन कापसे (वय 18 वर्षे, रा. राठी, खुळेवाडी, चंदननगर, पुणे) हिचा खून झाला. याप्रकरणी बबन तुळशीदास कापसे (वय 64) यांनी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी तात्काळ तपास करून दोन तासांत आरोपीला शोधून अटक केली.

याबाबत विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप शिंदे यांनी सांगितले की, लोहगांव बीट मार्शलचे कर्मचारी पोलीस नाईक ठोंबरे व पोलिस नाईक सुपे हे बुधवारी फॉरेस्ट पार्क या फनेल विभागात गस्त करीत असताना त्यांना झाडीत एका मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्याप्रमाणे पोलिस ठाण्याचे, तसेच पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 4 चे प्रसाद अक्का नवरू व येरवडा विभागाचे सहा. पोलिस आयुक्त गणेश गावडे घटनास्थळी आले व त्यांनी 3 पथके तयार करून वेगाने तपास करून मयत मुलीची ओळख पटवून तपास करून आरोपीस अटक करण्याबाबत सूचना दिल्या.

सूचनेप्रमाणे विमाननगर पोलिसांनी स्थानिकांचे मदतीने मयत मुलीच्या वडिलांचा शोध घेऊन घटनास्थळी बोलाविले असता त्यांनी तिचा मृतदेह ओळखला. काही दिवसांपूर्वी तिचे एक मुलगा परमेश्वर गंगाराम बोयाळे (वय 19 वर्षे, राठी, बोराडेवाडी, चंदननगर पुणे) याचेबरोबर प्रेमसंबध होते, परंतु मुलीची समजूत घातल्याने एप्रिलपासून ती त्याचेशी बोलत नव्हती व तिचे लग्न जमवायचे चालू होते. त्यामुळे परमेश्वर बोयाळे याच्या मनात राग होता, या त्यांनी दिलेल्या माहितीचे आधारे विमाननगर पोलीस ठाण्याच्या पथकाने परमेश्वर बोयाळे यास दोन तासांत ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रेमसंबंध तोडते म्हणून त्याने उमाला गोड बोलून फॉरेस्ट पार्क येथील झाडीत घेऊन जाऊन निर्मनुष्य ठिकाणी तिचा खून केल्याचे कबूल केले. आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलिस आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपआयुक्त परिमंडळ 4 प्रसाद अक्कानवरू व येरवडा विभागाचे सहा. पोलिस आयुक्त गणेश गावडे यांचे मार्गदर्शनाखाली करीत असून घटनास्थळी शांतता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com