पुणे - अवसरी बुद्रुकला पुणे जिल्ह्यातील पहिली ओपन जीम 

सुदाम बिडकर
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पारगाव (पुणे) : पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागातील पहिल्या ओपन जीम, नाना नानी पार्क व जॉगींग ट्रकचे उभारणी करण्याचा मान आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील अवसरी बुद्रुक या गावाने मिळवला त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामिण भागात गावोगावी जिम्नॅशियम सुरु होत आहे तरुणांमध्ये व्यायामाबाबत जागृती होत आहे. परंतु सर्वांनाच व्यायामासाठी जिम्नॅशियम मध्ये जाणे शक्य होत नसल्यामुळे येथील ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगाचा निधी तसेच जिल्हा परिषदेचा काही निधी वापरुन सुमारे 14 लाख 50 हजार रुपये खर्च करुन गावालगत असलेल्या महादेव मंदिर परिसरात जॉगींग ट्रकची उभारणी केली आहे. त्याबरोबर ट्रॅकच्या सभोवताली व्यायामाचे अत्याधुनिक साहीत्य बसवले आहे त्याचा फायदा गावातील तरुण, तरुणी व महिला यांना होणार आहे.

ओपन जीम चा उपक्रम हा जिल्हातील ग्रामिण भागातील पहीला उपक्रम असल्याचे त्यांनी सांगीतले. जीमच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे पाटील, संचालक दौलत लोखंडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निलेश थोरात, शरद बॅकेचे संचालक अशोक आदक पाटील, भीमाशंकरचे संचालक शांताराम हिंगे, ज्ञानेश्वर गावडे, बाजार समितीचे संचालक प्रमोद वळसे पाटील उपस्थित होते. या ठिकाणी जेष्ठ नागरीकांच्या विरंगुळ्यासाठी नाना नानी पार्क ही बनविण्यात आले आहे.  

Web Title: 1st open gym in pune districts avasari bk