कपड्यांची चोरी करणाऱ्या दोन सख्या भावांना अटक

जनार्दन दांडगे
सोमवार, 14 मे 2018

लोणी काळभोर (पुणे) : जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कापड दुकानातून कपड्यांची चोरी करणाऱ्या दोन सख्या भावांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण दोन लाख ७ हजार रुपयांची कपडे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. अटक केलेल्या आरोपींमध्ये नितेशकुमार खेतारामजी माळी (वय - ३६) व विक्रमकुमार खेतारामजी माळी (वय - ३४, दोघेही रा. १०८, मेडोग्रीन, डोंबिवली ईस्ट, मुंबई मुळ रा. फालना, ता. बाली, जि. पाली (राजस्थान)) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०१८ रोजी जेजुरी (ता. पुरंदर) येथील आर. एन. गारमेंटस या कापड दुकानाचे शटर उचकटून अज्ञात अज्ञात चोरट्यांनी २ लाख ५२ हजार २०० रुपयांचा माल चोरून नेला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने खबऱ्याकडून मिळलेल्या माहितीनुसार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान वरील दोन्ही आरोपी पुणे-नगर महामार्गावरील वाघोली येथे मोटारीतून येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्यांना पकडण्यात आले. याचवेळी त्यांच्याकडील १४ पिशव्यांमध्ये असलेल्या कपड्यांबाबत चौकशी केली असता, त्यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) व जेजुरी (ता. पुरंदर) येथील कापड दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या जवळून दोन लाख ७ हजार रुपयांची कपडे जप्त करण्यात आली. सदरच्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी येत्या शुक्रवार (ता. १८) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, दत्तात्रेय गिरमकर, पोलीस हवालदार दत्ता जगताप, पोलीस नाईक राजू मोमीन, नितीन गायकवाड, महेश गायकवाड, निलेश कदम, पोपट गायकवाड, विशाल साळुंखे, सचिन गायकवाड, नाईक ननवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

दरम्यान दोन्ही आरोपींनी लोणी काळभोर व जेजुरी पोलीस ठाण्यासह जिल्ह्यातील मंचर, आळेफाटा, सासवड व यवत या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक तर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील तीन अशा एकूण आठ गुन्ह्यांची कबुली दिली असून सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: 2 brothers arrested for cloth robbery