निमसाखर-निमगाव केतकी गटासाठी २ कोटी रुपयांचा निधी

राजकुमार थोरात
सोमवार, 9 एप्रिल 2018

दलित वस्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

वालचंदनगर -  पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील निमसाखर- निमगाव केतकी गटामध्ये २ कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला असल्याची माहिती  पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या भारती मोहन दुधाळ यांनी दिली.

दलित वस्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये शेळगाव गावातील गौरीमळा येथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी ५ लाख ८३ हजार रुपये, मोहितेमळा पाण्याची टाकी ८ लाख ९१ हजार रुपये, निमगाव केतकी रस्ता कॉक्रिटीकरणासाठी १५ लाख रुपये, कचरवाडी मधील मिसाळवस्ती मध्ये रस्ता कॉक्रिटकरणसाठी ५ लाख रुपये,निमसाखर मधील भोसलेवस्ती येथे पाणी पुरवठा योजनेसाठी १२ लाख ७६ हजार रुपये, खंडोबानगर रस्ता कॉक्रिटकरणासाठी २० लाख रुपये, निमजाईमळा येथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी ५ लाख रुपये, घोरपडवाडी येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी २ लाख रुपये व गावामध्ये दोन ठिकाणी रस्त्याचे कॉक्रिटकरणासाठी ४ लाख रुपये, शिरसटवाडी रस्ता
कॉक्रिटकरणसाठी ५ लाख रुपये, निरवांगी रस्ता कॉक्रिटकरणसाठी ८ लाख रुपये, गाेतोंडीमध्ये बंदिस्त गटार योजनेसाठी १० लाख रुपये,खोरोची मध्ये रस्ता कॉक्रिटकरण करण्यासाठी १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच शेळगाव बसस्थानक ते निमसाखर रसत्यासाठी ३५ लाख, शिरसटवाडी मध्ये रस्ता दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये,निरवांगी-दगडवाडी रस्ता दुरुस्तीसाठी २ लाख रुपये, शेळगाव मधील वैदवाडी येथील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

शळगाव मधील मुक्ताबाई देवस्थानसाठी १५ लाख, दगडवाडीमधील नंदिकेश्‍वर मंदिरासाठी ८ लाख रुपये, शाळा दुरुस्तीसाठी १० लाख रुपये मंजूर झाले असूल यामध्ये माळीवस्ती,खोरोची व निरवांगीमधील शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.तसेच कृषी व  पुशसंवर्धन खात्याच्या माध्यमातुन शेतकऱ्यांसाठी औषधफवारणीसाठी बॅटरीवरती चालणारे पंप, पीव्हीसी पाईप,फळांची वाहतुक करण्यासाठी कॅरेट,विद्युम मोटर,मिल्कींग मशिन, कडबा कुट्टी मशिन, शेळीमेंढ्या योजनेचा लाभ दिला आहे. शेळगाव व निमसाखर परीसरामध्ये टाळ, मृंगद, पकवाज व समाजप्रबोधन साहित्य दिले असुन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या गटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. झेडपी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी निधी मंजूर करण्यासाठी मदत केल्याची माहिती दुधाळ यांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: 2 Crore Rupees Funds for Nimasarkar-Nimgaon Katek Group