पिंपळे सौदागरमध्ये दोन दिवसीय योग कार्यशाळेला प्रारंभ

मिलिंद संधान
शनिवार, 23 जून 2018

नवी सांगवी (पुणे) : जागतिक योग दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील 'उन्नती फाऊंडेशन' आणि 'रोझलँण्ड सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या योग विषयक कार्यशाळेला आज शनिवार (ता. 23) पासून सुरूवात झाली. गोविंद गार्डन समोरील जी के गुरूकुल प्रशालेत सकाळी सात वाजता स्थानिक नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न काटे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संजय भिसे, दैनिक सकाळ पिंपरी आवृत्तीचे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर, वितरण वरिष्ठ व्यवस्थापक विनोद पाटील, रोझलँण्डचे चेअरमन संतोश मस्कर, चंदन चौरासिया व योग शिक्षक प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यशाळेला सुरूवात झाली. 

सुरूवात तीन वेळा ओमकार उच्चार, गुरूमहिमा व सरस्वती स्तवनाने झाली. त्यानंतर सर्वांनी मान, पाय व कंबरेच्या पुरक हालचालींचा  व्यायाम प्रकार केला. त्यानंतर सुर्याचा मंत्रोच्चार करीत सर्वांनी बारा सुर्यनमस्कार घातले. उभ्या स्थितीतील अर्धचक्रासन, त्रिकोणासन, वक्रासन केल्यानंतर बसून करावयाची भद्रासन, वज्रासन, शशांकासन, मकरासन व भुजंगासन ही योगासने लहानमोठ्यांसह सर्वांनीच केली. 

सहयोगी संपादक चिलेकर म्हणाले, "बदलत चाललेली जीवनशैली व त्यामुळे वाढत चाललेल्या असाध्य आजारांमुळे आज नैसर्गिक मृत्युचे प्रमाण 39 टक्यांवर आले आहे. नैराश्यातून दररोज आत्महत्या घडतायेत. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 22 लाख पाहता किमान पन्नास टक्के लोकांनी तरी दररोज योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा केली पाहिजे. केवळ वर्षभरातील एक दिवस योग साधना करून चालणार नाही. "

आयुर्वेदात योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. रात्री झोपताना दुध, सकाळी उठल्यावर उपाशी पोटी एक ते दिड पेला पाणी व दुपारी ताक पिल्याने आरोग्य चांगले रहाते. भरपेट न्याहरी, बऱ्यापैकी दुपारचे जेवन व रात्रीचा हलका आहार घेतल्यास पचनक्रीया सुधारते.
- डॉ. वैशाली यादव

शांती पाठाने आजच्या दिवसाची सांगता झाली.योग शिक्षक माया चुत्तर, डॉ वैशाली राजहंस, सुषमा जगताप, शैलेंद्र देखमुख, उमा बडगी, शेली शर्मा, रामकृष्ण पालमकर, गरिमा बलेजा, शोभा शुल्का यांनी कार्यक्रम यशस्वी केला. उद्या रविवार ( ता. 24 ) रोजी लोणावळा  कैवल्यधाम येथील योग शिक्षिका शोभा शुक्ला यांच्या 'विद्यार्थ्यांसाठी योगसाधनेचे महत्व' यावरील व्याख्यानाने कार्यशाळेचा समारोप होईल.

Web Title: 2 days yoga workshop starts in pimple saudagar