पुण्याजवळ वारकऱ्यांवर काळाचा घाला; दोन वारकऱ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पुणे : आळंदी येथील कार्तिकी वारीसाठी पंढरपूर येथून निघालेल्या संत नामदेव महाराज दिंडीमध्ये दिवेघाटात ब्रेक निकामी झालेला जेसीबी घुसल्याने झालेल्या अपघातात दोन वारकरी ठार झाले. तर, पंधरा वारकरी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास (वय 36) व अतुल महाराज आळशी (वय 24) यांचा समावेश आहे.   

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथून संत नामदेव महाराज पायी दिंडी आळंदीला कार्तिकी वारीसाठी जात असतो. या दिंडीत सुमारे 150 वारकरी होते. 

Image

आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दिवेघाटात वडकी गावाजवळील धबधब्याच्या वळणावर पुण्याच्या दिशेने निघालेला जेसेबी ब्रेेक निकामी झाल्याने या दिंडीत घुसला. त्यात संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास व अतुल महाराज आळशी (वय 24) या दोन युवा वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर, आठ वारकरी जखमी झाले आहेत. त्यात तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना हडपसर येथील नोबेल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 devotees dies and 15 are injured at Diveghat in JCB accident