बारामती तालुक्यात पहिली ते आठवीसाठी 2 लाख 42 हजार पाठ्यपुस्तके

संतोष आटोळे 
मंगळवार, 5 जून 2018

शिर्सुफळ - सारे शिकूया पुढे जाऊया असे म्हणत सुरू केलेल्या सर्व शिक्षा  अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी यंदाच्या नव्याने येणाऱ्या शैक्षणिक वर्षात बारामती तालुक्यासाठी सुमारे 45 हजार विद्यार्थ्यांच्या साठी 2 लाख 42 हजार 997 प्रतिंचे वितरण शाळा स्तरावर करण्यात येत आहे. यंदा विद्यार्थ्यांच्या खात्यावर पुस्तकांचे पैसे जमा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र अद्यापही पुरेशी बँक खाती न उघडण्यात आल्याच्या कारणाने थेट लाभ हस्तांतरण योजना यंदातरी बारगळली आहे. 

शिर्सुफळ - सारे शिकूया पुढे जाऊया असे म्हणत सुरू केलेल्या सर्व शिक्षा  अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी यंदाच्या नव्याने येणाऱ्या शैक्षणिक वर्षात बारामती तालुक्यासाठी सुमारे 45 हजार विद्यार्थ्यांच्या साठी 2 लाख 42 हजार 997 प्रतिंचे वितरण शाळा स्तरावर करण्यात येत आहे. यंदा विद्यार्थ्यांच्या खात्यावर पुस्तकांचे पैसे जमा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र अद्यापही पुरेशी बँक खाती न उघडण्यात आल्याच्या कारणाने थेट लाभ हस्तांतरण योजना यंदातरी बारगळली आहे. 

इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणारे बालक पुस्तकांपासून वंचित राहू नयेत. केवळ पुस्तकांअभावी शिक्षणात अडचणी येऊ नयेत, शाळेतील सर्व मुलांची 100  टक्के  उपस्थिती टिकावी, गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मुलांना सर्व शिक्षा  अभियानातून प्रतिवर्षी मोफत पुस्तके दिली जातात़. यावर्षीही महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व अंशत: अनुदानित खासगी प्राथमिक, शासकीय शाळा, अनुदानित अशा सर्व प्रकारच्या शाळांना ही पुस्तके मोफत पुरविली जाणार आहेत़. 

बालभारती, पुणे येथून जिल्ह्यास तालुकास्तरापर्यंत क्रमिक पाठ्यपुस्तकांचा पुरवठा मे 2018 पासून करण्यात येत आहे़. तालुकास्तरावर प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके गट शिक्षणाधिकाऱ्यांना तालुकास्तरावरुन केंद्र व शाळास्तरापर्यंत सर्व माध्यमांच्या शाळांना देण्यात आली आहेत. यामध्ये बारामती तालुक्यातुन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे इयत्ता पहिले ते पाचवीच्या मराठी माध्यमासाठी एकुण 1 लाख 11 हजार 166 पुस्तकांच्या प्रतिंची तर इयत्ता सहावी ते आठवीच्या साठी 1 लाख 31 हजार 831 पुस्तकांची प्रतिंची मागणी करण्यात आली होती. तर तालुक्यातील उर्दु माध्यमांच्या शाळांसाठी इयत्तासाठी पहिले ते पाचवी साठी 130 तर सहावी ते आठवीसाठी 156 पुस्तकांची मागणी करण्यात आली. त्यानुरुप पुस्तके बारामती पंचायत समितीकडे आल्यानंतर त्यांचे वितरण करण्यात आले. 

शासकिय निर्णयाप्रमाणे यापुढे सर्व लाभ वस्तु स्वरुपाने न देता थेट खात्यावर पैसे जमा करण्याबाबतचा आदेश होते. मात्र यंदाच्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांची बँक खाती  नसल्याने पुस्तकांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना हा लाभ थेट वस्तु म्हणजे पुस्तक रुपाने मिळणार असुन पुढील शैक्षणिक वर्षापासुन पुस्तकांचे पैसेही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. तर गणवेशासह शिष्यवृत्या इतर लाभाचे पैसे यंदाही  खात्यावर जमा होणार असल्याने बँक खाते नसलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची खाते उघडण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. 

तालुक्यातील इयत्ता, मुलांची संख्या व मागणी प्रतिंची संख्या खालील प्रमाणे
1) इयत्ता 1 ली - 5 हजार 131 - 15 हजार 393,
2) इयत्ता 2 री - 5 हजार 131 - 15 हजार 383,
3) इयत्ता 3 री - 5 हजार 231 - 20 हजार 824,
4) इयत्ता 4 थी - 5 हजार 282 - 26 हजार 410,
5) इयत्ता 5 वी - 5 हजार 526 - 33 हजार 156,
6) इयत्ता 6 वी - 5 हजार 920 - 41 हजार 440,
7) इयत्ता 7 वी - 5 हजार 905 - 41 हजार 335,
8) इयत्ता 8 वी - 6 हजार 123 - 49 हजार 056
एकुण 1 ते 8 वी- 44 हजार 249 - 2 लाख 42 हजार 997

विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देणार...
उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर १५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होणार असून, पात्र विद्यार्थ्यांना तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक नागरिक व पालकांच्या समक्ष ही पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी समारंभपूर्वक दिली जाणार आहेत़ अशी माहिती बारामतीचे गट शिक्षणाधिकारी किशोर पवार यांनी दिली.
 

Web Title: 2 lakh 42 thousand textbooks for the first to eighth students in Baramati taluka