Loksabha 2019 : बारामती लोकसभा मतदारसंघात सव्वादोन लाखांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघातील खेड-शिवापूर परिसरात बुधवारी दुपारी सव्वादोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली. मात्र, ही रोकड एका पेट्रोलपंप चालकाची असल्याची माहिती समोर आली आहे

पुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघातील खेड-शिवापूर परिसरात बुधवारी दुपारी सव्वादोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली. मात्र, ही रोकड एका पेट्रोलपंप चालकाची असल्याची माहिती समोर आली आहे.

खेड शिवापूर परिसरातील दत्ता ऑटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक स्वप्नील देशमुख ही रक्कम घेऊन जात असताना निवडणूक विभागाच्या पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी बॅगेत दोन लाख 28 हजार रुपयांची कॅश आढळून आली.

या प्रकरणी राजगड पोलिसांनी पंचनामा करून रोकड ताब्यात घेतल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

Web Title: 2 lakh 50 thousand Cash Seizure in Baramati Lok Sabha Constituency