दोन लाखांच्या पुस्तकांची केवळ दोन दिवसांत विक्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून अनेकांनी बाबासाहेबांचे समग्र साहित्य खरेदीचा आनंद घेतला. शासकीय फोटो झिंको मुद्रणालयात दोन दिवसांत (ता. १३ व १४) दीड ते दोन लाख रुपयांची विक्री झाली.

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून अनेकांनी बाबासाहेबांचे समग्र साहित्य खरेदीचा आनंद घेतला. शासकीय फोटो झिंको मुद्रणालयात दोन दिवसांत (ता. १३ व १४) दीड ते दोन लाख रुपयांची विक्री झाली.

मुद्रणालयातर्फे बाबासाहेबांच्या साहित्य खरेदीवर दहा टक्के सवलत देण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खंड एक ते बावीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातिव्यवस्थेचे निर्मूलन, भारताचे संविधान, महात्मा फुले समग्र वाङ्‌मय, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या विषयीचे खंड, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयीच्या खंडांना विशेष मागणी होती. मराठी भाषेतील खंड, ग्रंथ व पुस्तकांच्या खरेदीला अनेकांनी पसंती दर्शविली. खरेदी करणाऱ्यांत तरुणाईचे प्रमाण अधिक होते, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, बाबासाहेबांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील व अरोरा टॉवर जवळील पूर्णाकृती पुतळ्यावर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे प्रदेश महासचिव मिलिंद अहिरे यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

Web Title: 2 lakh book sailing in two days