वीस लाखांचे गोमांस खराळवाडीमध्ये जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पिंपरी - अहमदनगरहून नवी मुंबईला जाणारा टेंपो पिंपरी पोलिसांनी सापळा रचून जप्त केला व सुमारे 20 लाख किमतीचे गोमांस जप्त केले. ही कारवाई मुंबई-पुणे महामार्गावर खराळवाडी येथे मंगळवारी (ता. 29) पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (ता. 1) पोलिस कोठडी सुनावली आहे. 

अब्दुल रहमान अली महंमद खान (वय 37, रा. आकुर्सीनगर, नेहरूनगर, कुर्ला) असे टेंपोचालकाचे व एहसान महंमद इंद्रासी (वय 19, रा. कसाईवाडा कुर्ला, पश्‍चिम मुंबई), असे दुसऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 25, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगरहून मुंबईकडे टेंपोतून गाई व गोवंशाच्या मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती शिवशंकर स्वामी यांना मिळाली. स्वामी यांनी पिंपरी पोलिसांना खबर दिली, त्यानुसार पोलिसांनी खराळवाडीत सापळा रचून सदर टेंपोची तपासणी केली. तेव्हा गोमांस आढळून आले. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या सुधारित कलमान्वये गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक केली. 

Web Title: 20 lakhs of beef seized in Khalalwadi