फास्टॅगची गाडी सुसाट!

Fastag
Fastag

खेड शिवापूर टोलकनाक्यावर २० टक्क्यांनी वाढ
खेड शिवापूर - फास्टॅगद्वारे टोलवसुली बंधनकारक करण्यात आल्यानंतर खेड शिवापूर टोलनाक्यावर गेल्या पंधरा दिवसात फास्टॅगधारक वाहनांच्या संख्येत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती टोल प्रशासनाने दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) सर्व टोल नाक्यांवर १६ फेब्रुवारीपासून फास्टॅगद्वारे टोलवसुली बंधनकारक केली आहे. त्यानुसार खेड शिवापूर टोल नाक्यावरही फास्टॅगद्वारे टोल वसुली सुरू केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील फास्टॅग यंत्रणेचा आढावा घेतला असता, पंधरा दिवसांपूर्वी खेड शिवापूर टोलनाक्यावरून जाणाऱ्या फास्टॅगधारक वाहनांचे प्रमाण सुमारे ५० टक्के होते. सध्या टोलनाक्यावर दररोज धावणाऱ्या वाहनांपैकी ७० टक्के वाहने फास्टॅगधारक आहेत. तर, तीस टक्के वाहने ही विनाफास्टॅग धावतात. या ३० टक्के वाहनांना नियमानुसार दुप्पट टोल देऊन पुढे जावे लागते. सध्या टोलनाक्यावरून दररोज सुमारे ४२ हजार वाहने धावतात. फास्टॅग बंधनकारक करण्यात आल्यानंतर गेल्या पंधरा दिवसात त्यात सुमारे २० टक्के वाढ झाली आहे.  

दरम्यान, वाहनांना फास्टॅग बसविण्यासाठी विविध बँकांचे बूथ टोल नाक्यावर उपलब्ध आहेत. सुमारे दहा मिनिटांत वाहनांना फास्टॅग बसवून दिला जातो, अशी माहिती खेड-शिवापूर टोल प्रशासनाने दिली.

४२ हजार - टोलनाक्यावरून रोज जाणारी वाहने
सुमारे ५० टक्के - १५ दिवसांपूर्वी फास्टॅगधारक वाहनांचे प्रमाण
सुमारे ७० टक्के - सध्या फास्टॅगधारक वाहनांचे प्रमाण
सुमारे ३० टक्के - विनाफास्टॅगधारक वाहनांचे प्रमाण

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com