पवना धरणात वीस टक्के साठा

पवना धरण - पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा.
पवना धरण - पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा.

पवनानगर - पवना धरणात २० टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो १५ जुलैपर्यंत पुरेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली माहिती. 

पवना धरणात २०.५१ टक्के साठा शिल्लक असून मागील वर्षाच्या तुलनेत तो सात टक्के कमी झाला आहे. मॉन्सून लांबणीवर पडल्यास मावळसह पिंपरी-चिंचवडकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. धरणाची क्षमता १० हजार दशलक्ष घनमीटर आहे. पाणी पातळी १.७५ हजार दशलक्ष घनमीटर आहे. पवना धरणातून रोज १२०० क्‍युसेसने सहा तास पाणी विसर्ग केला जातो. 

पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल म्हणाले, की पवना धरणात २० टक्के साठा शिल्लक असून तो १५ जुलैपर्यंत पुरेल. सध्या पिंपरी-चिंचवड पालिकेने पाणीकपात सुरू केली असून पवना धरणातूनही नेहमीपेक्षा १० टक्के पाणी कमी सोडण्यात येत आहे.

मागील पाच वर्षांतील मे महिन्यातील शिल्लक पाणीसाठा 
२०१५  -   २४.९७
२०१६ -    १०.२४
२०१७  -   २०.२८
२०१८ -    २०.२८
२०१९ -   २०.५१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com