बलात्कारातील आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी 

संदीप घिसे 
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

पिंपरी (पुणे) : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांची सक्तमजुरीची तर गुन्ह्यांमध्ये त्याला साथ देणाऱ्या मित्रास तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

पप्पू ऊर्फ रिजवान मोहम्मद शेख (वय २०), सागर ऊर्फ दाद्या सिध्दु रंजनगी  दोघेही रा. चिंचवड) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक निरीक्षक सपना देवतळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २‍०१६ मध्ये तीनही आरोपींनी आपसात संगनमत करून शाळेत चाललेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून मोटारीतून पळवून नेले. आरोपी पप्पू याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच त्याच्या दोन साथीदारांनी यासाठी त्याला मदत केली. यापैकी एक आरोपी अल्पवयीन होता. 

या गुन्ह्याचा तपास चिंचवड पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक सपना देवतळे यांनी केला. सबळ पुरावे सादर केल्याने न्यायालयाने आरोपी पप्पू याला २० वर्ष तर त्याचा मित्र दादया याला तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

Web Title: 20-year-old rape accused gets 20 years of age