
पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २०० कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण येत्या आठवडाभरात पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे.
पुणे - पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २०० कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण येत्या आठवडाभरात पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. या कर्मचाऱ्यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात लस देण्यात येत आहे.
यासाठी जिल्हा परिषद मुख्यालय ते औध रुग्णालयात कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याची जिल्हा परिषदेच्यावतीने वाहनाची सोय करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
झेडपी मुख्यालयात विविध विभागांत मिळून चारशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांमध्ये मिळून सहाशेव्या आसपास कर्मचारी आहेत. पंचायत समिती कर्मचाऱ्यांना तालुकास्तरावर कोरोना लस देण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण होईल, अशी अपेक्षाही घुले यांनी यावेळी व्यक्त केली.
रायगडचा डिस्कोथेक करून टाकला; संभाजीराजेंचा तीव्र संताप
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३९ हजार ९६७ आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण केले जाणार आहे. त्यांपैकी आतापर्यंत २२ हजार ३५४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यासाठी ग्रामीण भागात ४१ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आजअखेरपर्यंत ५६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली आहे.
Edited By - Prashant Patil