सव्वा दोन हजार विद्यार्थींनींना सायकली

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 7 जुलै 2018

मंचर : “पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनेच्या (डीबीटी) माध्यमातून शालेय विद्यार्थ्यीनींना दोन हजार 222 विद्यार्थींनींना सायकली मिळणार आहेत. त्यामुळे दररोज शिक्षणासाठी विद्यार्थीनींची होणारी पायपीट कमी होणार आहे.’’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या  महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके व जिल्हा परिषद सदस्या  तुलसी सचिन भोर यांनी दिली.

मंचर : “पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनेच्या (डीबीटी) माध्यमातून शालेय विद्यार्थ्यीनींना दोन हजार 222 विद्यार्थींनींना सायकली मिळणार आहेत. त्यामुळे दररोज शिक्षणासाठी विद्यार्थीनींची होणारी पायपीट कमी होणार आहे.’’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या  महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके व जिल्हा परिषद सदस्या  तुलसी सचिन भोर यांनी दिली.

 पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडून डीबीटी अंतर्गत वैयक्तीच्या लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाकडून दरवर्षी शालेय विद्यार्थींनींसाठी सायकल योजना राबविली जाते. परंतू मागील वर्षी ही योजना काही कारणांमुळे राबवण्यात आली नव्हती. योजनेला "खो' मिळाला. मात्र, यंदा या योजनेसाठी एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचा 50 लाख तर विशेष घटकासाठी 50 लाख रूपयांचा समावेश आहे. त्या निधीतून जिल्ह्यातील विद्यार्थीनींना लाभ मिळणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेची आकडेवारी पाहिली तर जिल्ह्यात मुली अव्वल स्थानी आहेत. त्यामध्ये विद्यार्थीनी शिक्षणासाठी दोन ते तीन किलोमिटर चालत जात असल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळते. काही ठिकाणी वाहतुकीची सुविधा नाही. तर ज्या ठिकाणी आहे तिथे बसचे तिकिट काढण्याएवढे पैसेही नाही. त्यामुळे दररोजची पायपीट ही "पाचवीला पुजली' आहे, असे न म्हणता शिक्षणाच्या ओढीने या मुली शाळेत पायी जातात. दरम्यान, विद्यार्थीनींची पायपीट थांबावी, त्यांना वेळेत शाळेत जाता यावे. यासाठी "सायकल योजना' राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.   सायकल योजनेला  यंदा भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. असे भोर यांनी सांगितले. त्यानुसार यंदा जिल्ह्यातील प्राधान्याने इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना डीबीटी अंतर्गत सायकल देण्यात येणार आहे. त्यामुळे ही सायकल योजना विद्यार्थीनींसाठी खऱ्या अर्थाने आनंद देणार असल्याचेही भोर यांनी सांगितले.

ता. 25  जुलैपर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत आहे. डीबीटी अंतर्गत देण्यात येणाऱ्या सायकल योजनेचा लाभ पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थीनींना घेता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थीनींनी वेळेत अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. त्यामध्ये प्राधान्याने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थीनींना लाभ देण्यात येणार आहे. लाभ घेणाऱ्या विद्यार्थीनीचे घर आणि शाळा यांच्यामधील अंतर किमान दोन किमी असावे. जास्तीत जास्त विद्यार्थींनीनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन महिला व बालकल्याण समिती च्या  सभापती राणी शेळके व सदस्या तुलसी भोर यांनी केले आहे.

 

 

Web Title: 2025 cycle for girls student