पुणे जिल्ह्यात आज 2039 नवे कोरोना रुग्ण; चोवीस तासात 58 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.8) दिवसभरात 2 हजार 39 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 798 जण आहेत. यामुळे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता 3 लाख 1 हजार 392 झाली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात 58 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.8) दिवसभरात 2 हजार 39 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 798 जण आहेत. यामुळे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता 3 लाख 1 हजार 392 झाली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात 58 जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यःस्थितीत जिल्ह्यात केवळ 32 हजार 947 सक्रिय (पॉझिटिव्ह) कोरोना रुग्ण आहेत. यापैकी 18 हजार 287 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित 14 हजार 660 जणांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येचे प्रमाण सुमारे बारा हजारांनी कमी झाले आहे.

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 561, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 494, नगरपालिका क्षेत्रात 132 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 54 नवे रुग्ण सापडले आहेत.आज दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील सर्वाधिक 32 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 9, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 13 आणि नगरपालिका क्षेत्रातील 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.7) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता.8) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील 7 हजार 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 3 हजार 911, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 405, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 1 हजार 127, नगरपालिका क्षेत्रातील 406 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 179 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 300 जण आहेत. आतापर्यंत 12 लाख 54 हजार 373 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी आज दिवसभरात 10 हजार 123 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

आज 2707 कोरोनामुक्त
जिल्ह्यात आज दिवसभरात 2 हजार 707 कोरोनामुक्त झाले आहेत. आजही नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण जास्त आहे. आजच्या एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील 805, पिंपरी चिंचवडमधील 713, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 946, नगरपालिका क्षेत्रातील 235 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 8 जणांचा समावेश आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2039 Corona Patient found in Pune district