रस्ता अडविल्याप्रकरणी 21 जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षण आंदोलनासाठी पुकारलेल्या बंददरम्यान खंडूजीबाबा चौकात रस्ता अडविल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी 21 जणांना अटक केली आहे. शांततेत पार पडत असलेल्या मोर्चामध्ये घुसून सार्वजनिक रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. 

पुणे- मराठा आरक्षण आंदोलनासाठी पुकारलेल्या बंददरम्यान खंडूजीबाबा चौकात रस्ता अडविल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी 21 जणांना अटक केली आहे. शांततेत पार पडत असलेल्या मोर्चामध्ये घुसून सार्वजनिक रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. 

याप्रकरणी डेक्कनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर यांनी फिर्याद दिली आहे. डेक्कन येथील खंडूजीबाबा चौकात गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या बंदमध्ये सहभागी झालेल्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आपला सहभाग नोंदविला. दुपारी दोननंतर सर्वजण निघूनही गेले. मात्र त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास काहीजण या आंदोलनामध्ये घुसले. त्यांनी सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत खंडूजीबाबा चौकात ठिय्या मांडला. त्यामुळे प्रमुख चौक व प्रमुख रस्ता बंद झाला. पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशाकडे 21 जणांनी दुर्लक्ष केले.

पोलिसांनी वारंवार सांगूनही त्यांनी ऐकले नाही. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

Web Title: 21 people arrested in road close