Pune Crime News : पुण्यात चिपळूणच्या तरूणाची दगडाने ठेचून हत्या; परिसरात खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

21 years old youth murderd by stone police arrested 3 people pune latest news

Pune Crime News : पुण्यात चिपळूणच्या तरूणाची दगडाने ठेचून हत्या; परिसरात खळबळ

Pune Crime News : किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी पुण्यातील जांभूळ रोडवर चिपळूण येथील तरुणाचे अपहरण करून, त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .

या भीषण प्रकारानंतर पुणे पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये तीन संशयित आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत. सौरभ शैलेंद्र मयेकर (वय-२१) असे या मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तिघांनी एका तरुणाचे अपहरण केले. तसेच त्याला साते गावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन त्याच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी घडली. पोलिसांनी पोलिसांनी काही तासांतच खून करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली. याप्रकरणी व्हिजन सिटी जांभूळ येथील 18 वर्षीय संशयित आरोपी व दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा - झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मयेकर याची आरोपींसोबत जांभूळ रोडवर भांडणे झाली होती. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मयेकर याची गाडी अडवून त्याचे अपहरण केले. ब्राह्मणवाडी साते गावच्या हद्दीत असलेल्या खापरे ओढ्याजवळ नेऊन त्याला मारहाण केली तसेच डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.

टॅग्स :Pune News