प्रवाशांसाठी खूशखबर ! आळंदी यात्रेसाठी पीएमपीचे 211 बसचे नियोजन

211 PMT Buses for alandi in Kartiki Ekadashi
211 PMT Buses for alandi in Kartiki Ekadashi

पुणे : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी यात्रेसाठी पीएमपीने 211 जादा बसचे नियोजन केले आहे. स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी आणि रहाटणी या पीएमपीच्या स्थानकांपासून येत्या बुधवारपासून (ता. 20) पुढील मंगळवारपर्यंत (ता. 26) ही बससेवा उपलब्ध राहणार आहे.

आळंदी यात्रेसाठी मार्गावरील नियमित 87 बस खेरीज जादा 124 बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या गर्दीनुसार शुक्रवारपासून (ता. 22) जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दरम्यान रात्रीनंतर जादा बससेवेसाठी नेहमीच्या तिकिटापेक्षा 5 रुपये जादा प्रवासी भाडे आकारण्यात येणार आहे. तसेच, यात्रेदरम्यान रात्री अकरानंतरच्या बससेवेसाठी प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे पास वापरता येणार नाहीत.

जेव्हा शरद पवार कोण नवनीत राणा असा प्रश्न करतात?

यात्रेदरम्यान, बस संख्या वाढणार असल्यामुळे आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरीत करून ते काटेवस्ती येथून संचलीत करण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान जादा बससेवा सोडण्यात येणार असल्यामुळे आळंदी रस्त्यावरील मार्ग क्रमांक 264 मनपा ते बहुळगाव हा मार्ग संपूर्णतः बंद राहणार आहे. तसेच मार्ग क्रमांक 257 वाघोली ते आळंदी या मार्गावरील बस मरकळ रस्त्यावरील लक्ष्मी मंगल कार्यालय येथून संचलनात राहतील, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com