दोन वर्षांत महाप्रसादासाठी बनविले २२ लाख लाडू 

दिलीप कुऱ्हाडे 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

येरवडा : कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील पंचवीस महिला कैदी गेली दोन वर्षांपासून महालक्ष्मीचा महाप्रसादासाठी लाडू बनविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी आता पर्यंत २२ लाख लाडू तयार केले आहे. त्यांनी दोन कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून राज्य सरकारला निव्वळ ७० लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे. त्यांनी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सरकारकडे साकडे घातले आहे. 

‘कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन’अंतर्गत कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील २५ महिला कैदी महालक्ष्मीचा महाप्रसादासाठी लाडू तयार करीत आहेत. लाडूंची गुणवत्ता व स्वच्छ परिसरामुळे महालक्ष्मी देवस्थान समितीने कैद्यांना लाडू बनविण्याचे काम दिले आहे. त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमाची अनेकांनी प्रसंया केली आहे. 

या सदंर्भात कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक शरद शेळके म्हणाले, ‘‘ सध्या कोल्हापूर कारागृहातील २५ महिला कैदी व २० पुरुष कैदी महाप्रसादासाठीचे लाडू बनवित आहेत.गेल्या नवरात्रीमध्ये कैद्यांनी २० लाख लाडू बनविले होते. आषाढ महिन्यात दररोज दहा हजार लाडूंची मागणी होती. तर देवस्थान समितीकडून नियमित पाच हजार लाडूंची मागणी असते. 

‘‘महालक्ष्मी देवस्थान समितीने नुकतेच महाप्रसाद बनविणाऱ्या महिला कैद्यांना देवीची साडीचोळी देऊन सत्कार केला. यावेळी महिला कैद्यांनी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी इच्छा प्रकट केली. याबाबत कारागृह प्रशासनाकडे राज्याच्या गृहविभागाकडे परवानगी मागितली आहे.’’ 
- शरद शेळके, अधिक्षक, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह

‘‘महिला कैद्यांनी दोन वर्षांत २२ लाख लाडू बनविले आहे.कोल्हापूर कारागृहाने लाडू उत्पादनातून दोन कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर त्यातून सरकारला ७० लाख रुपयांचा महसूल मिळाला असला तरी समाजाने कैद्यांच्या हातचा प्रसाद स्विकारणे हा मोठा सामाजिक बदल आहे’’
- स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्‍चिम महाराष्ट्र

Web Title: 22 lakh laddu for Mahaprasad in two years