प्रवाशांचे मेगाहाल! पुणे ते मुंबई दरम्यानच्या 22 गाड्या महिनाभर रद्द

Train
Train

पुणे : पुणे-मुंबई या दोन शहरादम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने पूर्ण नोव्हेंबर महिन्यासाठी अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेससह 22 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच काही गाड्यांच्या मार्गात बदल देखील करण्यात आला आहे. परिणामी, दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पुढील महिनाभर मोठे हाल होणार आहेत. 

पुणे-लोणावळादरम्यान रेल्वेचा ब्लॉक; लोकल महिनाभर रद्द

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत ते मंकी हिल स्थानकादरम्यान रेल्वे रुळाच्या कामासह पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी आधी 31 ऑक्‍टोबरपर्यंत या गाड्या रद्द केल्या होत्या. मात्र, हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. या कामाला आणखी एक महिना लागणार आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या 22 लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. तसेच मुंबई ते पुणे मार्गावरील प्रगती एक्‍स्प्रेससह अनेक गाड्या रद्द, तर काही गाड्या अन्यत्र वळविण्यात आल्या आहेत. परिणामी, संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात अप मार्गावरील बहुतांश गाड्या या पुण्यापर्यंतच चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच डाऊन मार्गावरील गाड्याही पुण्यातून सुटणार आहेत. त्यामुळे महिनाभराच्या या ब्लॉकमुळे मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. 

रद्द करण्यात आलेल्या गाड्या 
- पुणे-मुंबई प्रगती एक्‍स्प्रेस (30 नोव्हेंबर) 
- मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेस (30 नोव्हेंबर) 
- मुंबई-पंढरपूर पॅसेंजर (30 नोव्हेंबरपर्यंत) 
- पंढरपूर-मुंबई पॅसेंजर (30 नोव्हेंबरपर्यंत) 
- मुंबई-विजापूर पॅसेंजर (27 नोव्हेंबरपर्यंत) 
- विजापूर-मुंबई पॅसेंजर (28 नोव्हेंबरपर्यंत) 
- नांदेड-पनवेल साप्ताहिक स्पेशल (30 नोव्हेंबरपर्यंत) 
- पनवेल-नांदेड साप्ताहिक स्पेशल (24 नोव्हेंबरपर्यंत) 
- पनवेल-पुणे पॅसेंजर (30 नोव्हेंबरपर्यंत) 
- पुणे-पनवेल पॅसेंजर (30 नोव्हेंबरपर्यंत) 

या गाड्या पुण्यापर्यंतच 
- मुंबई-कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेस 
- कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस 
- हुबळी-टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस 
- टिळक टर्मिनस-हुबळी एक्‍स्प्रेस 
- हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्‍स्प्रेस 
- मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्‍स्प्रेस 
- विशाखापट्टणम-टिळक टर्मिनस 
- नांदेड-पनवेल एक्‍स्प्रेस 

दौंड-मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या 
- भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस (30 नोव्हेंबरपर्यंत) 
- पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेस (30 नोव्हेंबरपर्यंत) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com