बनावट पासपोर्ट बनवून 22  वर्षीय तरुणी गेली दुबईला; पोलिसांना लागला सुगावा अन्

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 December 2020

बनावट कागदपत्रांआधारे आधारकार्ड तयार करून त्याआधारे पासपोर्ट मिळवून नोकरीसाठी दुबईला जाऊन आलेल्या 22 वर्षीय तरुणीला विमानतळ पोलिसांनी अटक केली.

पुणे- बनावट कागदपत्रांआधारे आधारकार्ड तयार करून त्याआधारे पासपोर्ट मिळवून नोकरीसाठी दुबईला जाऊन आलेल्या 22 वर्षीय तरुणीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. दम्मू सितारत्नम (वय 22, रा. विशाखापट्टणम, राज्य आंध्रप्रदेश) असे तिचे नाव आहे. तर पासपोर्टसाठी मदत करणारा एजंट सूर्या (रा. विशाखापट्टणम) या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीला पिस्तूल दाखवणे पतीच्या अंगलट; 2 पिस्तूलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

गुरुवारी (ता. 3) रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दम्मू हिने दासरी स्वप्ना या नावाने बनावट आधारकार्ड तयार केले. आधारकार्ड तसेच बनावट कागदपत्रे तिने पासपोर्ट कार्यालयात सादर करत पासपोर्ट मिळविला. त्याआधारे तिने नोकरीसाठी दुबईचा व्हिसा मिळविला. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथून दुबईला गेली. तर, 3 डिसेंबर रोजी दुबईतून पुणे येथे आली असता लोहगाव नागरी विमानतळ येथे तिला अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला 8 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले आधारकार्ड सूर्या याने दिल्याचे आरोपी सांगत आहे. बनावट पासपोर्ट तसेच आधारकार्ड तयार करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा असल्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने तपास करायचा आहे. गुन्ह्यांच्या अधिक तपासासाठी विशाखापट्टणम येथे जाऊन मुख्य आरोपीचा शोध घ्यायचा असल्याने तिला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 22 year old woman went to Dubai with a fake passport police arrested