२२५ सुबाभळीची झाडांची जेसीपीच्या सहाय्याने कत्तल

pune
pune

हडपसर(पुणे) : काळेपडळ येथील स.न ७० व ७२ मधील वैष्णवीनगर मधील 20 ते 25 वयोगटातील २२५ सुबाभळीची झाडांची खासगी विकासकाने विनापवाना कत्तल केली आहे. हि जागा असून विकसकाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. जेसीपीच्या सहाय्याने ही वृक्षतोड करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्रा शेजारील नाल्याकडेच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरसेविका नंदा लोणकर, माजी नगरसेवक फारूख इनामदार आणि माजी वृक्ष समिती सदस्य डॉ. शंतनू जगदाळे यांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर पाठपुरावा केला व त्यानुसार उदयान विभागाकडून कत्तल झालेल्या झाडांचा पंचनामा करण्यात आला. तसेच पंचनामा करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

याबाबत वृक्ष निरिक्षक ज्ञानोबा बालवडकर म्हणाले, वृक्ष तो़ड करण्यात आलेली जागा खासगी विकसकाची असून अदयाप त्याचे नाव समजले नाही. सुमारे २२५ झाडांची कत्तल करण्यात आली असून माहिती घेवून संबधीत विकसकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com