औंधमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; डोक्यात केले कुऱ्हाडीने वार

Crime_Murder
Crime_Murder

औंध (पुणे) : येथील मलिंग चौकात भर रस्त्यात मागील भांडणाचा राग मनात धरून क्षितिज लक्ष्मीकांत वैरागर (वय २१) या तरुणाचा अनिकेत दिलीप दीक्षित (वय २३) याने डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.१९) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षितीज हा औंध येथील चौकातून चालत जात असताना अनिकेतने मागून येऊन त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती चतु:शृंगी पोलिसांना कळवण्यात आल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी मृत तरुणाचे मामा धनंजय गुलाब थोरात (रा.औंध) यांच्या तक्रारीवरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षितीज आणि संशयीत आरोपी यांच्यात मागील तीन महिन्यांपूर्वी काही कारणावरुन वाद झाले होते. याप्रकरणी क्षितीजवर गुन्हाही नोंद झाला होता. मागील भांडणाचा राग मनात ठेवून संशयितांनी भर रस्त्यात खून केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. संबंधित संशयित आरोपीला चतु:शृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com