Coronavirus : खेड तालुक्यात अवघ्या 15 दिवसांत...

Coronavirus : खेड तालुक्यात अवघ्या 15 दिवसांत...

कडूस : पंधरा दिवसांपूर्वी शून्यावर असलेली खेड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आजच्या घडीला 24 वर पोहोचली आहे. आज कडूसला आणखी एका पॉझिटिव्हची वाढ झाली. मुख्य म्हणजे राक्षेवाडीचा अपवाद वगळता हे सर्व रुग्ण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमधील आहे आणि या सर्व रुग्णांचे मुंबईशी कनेक्शन आहे. यामुळे मुंबईहून आलेल्या 'आपल्याच' माणसांपासून पश्चिम पट्ट्यातील गावांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

पंधरा दिवसांपूर्वी खेड तालुका कोरोनामुक्त होता.14 मे रोजी तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह सापडला. त्यानंतरच्या दोन दिवसात पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात असलेले आणखी चार जण कोरोनाबाधित सापडले. त्यानंतर दहा दिवस तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही, परंतु 25 मेपासून पॉझिटिव्ह सापडण्याचा वेग दिवसागणिक वाढत आहे. शुक्रवारी (ता.29) वेताळे, वाशेरे, वाजवणे आणि रविवारी (ता.31) गावांमधून प्रत्येकी एक जण असे चार जण कोरोनाबाधित सापडल्याने 31 मे रोजी तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 24 वर पोचला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कडूसला एका सहा वर्षाच्या मुलीला लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत राक्षेवाडीत पाच, कडूस येथे चार, वडगाव दोन, कुरकुंडीत तीन, पापळवाडीत चार, चाकण, पाईट, बुरसेवाडी, वेताळे, वाशेरे, वाजवणे गावात प्रत्येकी एक असे तालुक्यात कोरोनाबाधित सापडले आहे. त्यातील तब्बल 19 पॉझिटिव्ह गेल्या सहा दिवसात सापडले आहेत. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावात बहुतांश नागरिक मुंबईहून आले आहेत आणि पश्चिम पट्ट्यातील गावांमध्येच आता पॉझिटिव्ह सापडत आहेत. म्हणजे सापडलेले पॉझिटिव्ह मुंबईशी कनेक्टेड आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईकरांमुळे पश्चिम पट्ट्यातील गावांना धोका वाढला आहे. आता या गावातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची वेळ आली आहे. गावाला कोरोनामुक्त ठेवायचे असल्यास गावात शासकीय सूचना व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी. बाहेरगावाहून आलेल्यांचा संपर्क टाळला पाहिजे. गावात क्वारंटाईनची संकल्पना कठोरपणे राबवली पाहिजे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्यामुळे गावाला धोका पोचू नये, यासाठी बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी सुद्धा गावकऱ्यांना सहकार्य करायला हवे. ऐकत नसलेल्यांना ग्रामस्थांनी पोलिसांचा हिसका दाखवायला हवा. गावातील प्रत्येकाने प्रयत्न केले तरच गाव कोरोनाच्या धोक्यापासून दूर राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com