esakal | समाजकल्याणकडून अत्याचार पीडितांसाठी २४ कोटींचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

PUNE

समाजकल्याणकडून अत्याचार पीडितांसाठी २४ कोटींचा निधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रकरणांमधील पीडित व्यक्तींना समाज कल्याण विभागाकडून २४ कोटींचा निधी राज्यातील क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी पीडितांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती समाजकल्याण आयुक्तालयाकडून देण्यात आली.

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्ह्यांमधील पीडितांना समाज कल्याण विभागाच्या वतीने अर्थसाहाय्य देण्यात येते. हा प्रलंबित निधी उपलब्ध करून देण्याबाबत समाज कल्याण आयुक्तालयाकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानुसार सामाजिक न्याय मंत्री धनंजय आणि राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नांतून समाज कल्याण आयुक्तालयाला २४ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत.

हेही वाचा: पुणे : विकास धुमाळकडे १८ अपात्र केलेले प्रवेश अर्ज

समाज कल्याण आयुक्तालयाने हा निधी राज्यातील संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना वितरित केला आहे. अत्याचार पीडितांना घडलेल्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार अर्थसाहाय्य देण्यात येते. यात गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार किमान ८५ हजार ते जास्तीत जास्त ८ लाख २५ हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते.

हेही वाचा: स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?

राज्य सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आयुक्तालयास २४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी राज्यातील क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे लवकरच अत्‍याचार पीडितांना अर्थसाहाय्य मिळेल.

- डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण

loading image
go to top