२४ तास पाण्याची प्रतीक्षा कायम

Water-Supply
Water-Supply

पिंपरी - केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनएनयुआर) शहराच्या ४० टक्के भागात २४ बाय सात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र, दोन वर्षांत काम करण्याची मुदत वर्षापूर्वीच संपली. तेव्हा ठेकेदाराला एक वर्षाची मुदतवाढ दिली. तीही उलटून तीन महिने झालेत. त्याला पुन्हा मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ दिली. तरीही केवळ ३५ टक्केच काम झालेले आहे. त्यामुळे २४ तास पाण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागेल, याची शाश्‍वती नाही.

शहरातील ४० टक्के भागात २४ बाय सात पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम दोन वर्षांत पूर्ण करणे व त्याची पाच वर्षे देखभाल करण्याचे काम नागपूरच्या विश्‍वराज इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीला १८ जून २०१६ ला दिले. १८ जून २०१८ पर्यंत काम पूर्ण करायचे होते. मात्र, त्यास विलंब झाल्याने १८ जून २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली. तरीही काम अपूर्ण राहिल्याने आणखी मुदतवाढ दिली आहे. याकामाची मार्च २०१७ व नोव्हेंबर २०१८ मध्ये पाहणी करून राज्य व केंद्र सरकारला अहवाल पाठविला आहे. 

या योजनेसाठी केंद्र सरकारचे ५० टक्के व राज्य सरकारचे २० टक्के अनुदान मिळाले आहे. महापालिकेचा वाटा ३० टक्के आहे. योजनेसाठी केंद्र सरकारकडून २५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता एप्रिल २०१५ मध्ये मिळाला होता. त्यानंतर कामास सुरवात झाली.

लाभक्षेत्र (शहराच्या ४० टक्के भागासाठी योजना)
    त्रिवेणीनगर टाकी : यमुनानगर, निगडी गावठाण, साईनाथनगर, कस्तुरी मार्केट, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर, शाहूनगर
    सेक्‍टर २९ टाकी : रावेत, पुनावळे, शिंदे वस्ती, गुरुद्वारा परिसर
    एल्प्रो टाकी : श्रीधरनगर, भोईर कॉलनी, धोका कॉलनी, देवघर सोसायटी, एल्प्रो सोसायटी, माणिक कॉलनी, केशवनगर, काकडे पार्क, चिंचवडगाव
    प्रेमलोक पार्क टाकी : प्रेमलोक पार्क, इंदिरानगर, उद्योगनगर, दळवीनगर, भोईरनगर, क्वीन्स टाउन
    दत्तनगर टाकी : डांगे चौक ते चिंचवड पूल, रोझवूड ते वीटभट्टी रस्ता
    नवी सांगवी : साई चौक ते कृष्णा चौक, पीडब्ल्यूडी मैदान
    जुनी सांगवी टाकी : मधुबन, शितोळेनगर, आनंदनगर, गावठाण
    पीडब्ल्यूडी टाकी : ममतानगर, प्रियदर्शनीनगर, जयमालानगर, संगमनगर, पवारनगर, ढोरेनगर, शिंदेनगर, मुळानगर, लक्ष्मीनगर
    अजमेरा टाकी : अजमेरा, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, ऑटो क्‍लस्टर, एम्पायर इस्टेट
    मगर स्टेडियम टाकी : टेल्को सोसायटी, स्वप्ननगरी, उद्यमनगर, वास्तुउद्योग, यशवंतनगर
    भोसरी गावठाण टाकी : गावठाण, गव्हाणे वस्ती, सेन्च्युरी एन्का, आदिनाथनगर
    संत तुकारामनगर, भोसरी टाकी : खंडोबामाळ, सॅण्डविक कॉलनी, दिघी रोड, संभाजीनगर, सावंतनगर, शिवनगरी, संत ज्ञानेश्‍वरनगरी, गुरुदत्त कॉलनी, आळंदी रस्ता
    दिघी टाकी : गावठाण
    बोऱ्हाडेवाडी टाकी : बोऱ्हाडे वस्ती, सावता माळीनगर, विनायकनगर, संजय गांधीनगर, वाघेश्‍वरवाडी, फरांदे स्कीम
    डब्ल्यूडी ४ टाकी : सेक्‍टर ११, नऊ, आठ, सहा, चार, गंधर्वनगरी, खानदेशनगर, जय गणेश साम्राज्य. 
    ई-१ प्राधिकरण टाकी : प्राधिकरण सेक्‍टर २३ ते २७, २७ अ, २८, दत्तवाडी- आकुर्डी
    सेक्‍टर ७ व १० टाकी : प्राधिकरण सेक्‍टर सात, सेक्‍टर १० व मोशी- प्राधिकरण
    बिजलीनगर टाकी : सेक्‍टर ३०, ३१, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर.

केंद्र सरकारच्या २४ बाय सात पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार विश्‍वराज इंफ्रास्ट्रक्‍चर कंपनीला दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. कामास विलंब केल्याने आतापर्यंत ठेकेदाराकडून तीन कोटी ४८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 
- मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com