मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सव्वा लाखाकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये ९६३, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २५९, नगरपालिका क्षेत्रात ७३ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ६४ नवे रुग्ण सापडले आहेत.​

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.१५) दिवसभरात २ हजार ४३२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील सर्वांधिक १ हजार १७७ जणांचा समावेश आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची सव्वा लाखाकडे वाटचाल सुरू झाली असून, येत्या दोन दिवसांत हा आकडा ओलांडला जाण्याची शक्यता आहे. 

शनिवारी दिवसभरात आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ७३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच ६२ रुग्णांचा शनिवारी दिवसभरात मृत्यू झाला आहे. 

'माही जैसा कोई नहीं!'​

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये ९६३, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २५९, नगरपालिका क्षेत्रात ७३ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ६४ नवे रुग्ण सापडले आहेत.

दिवसभरात झालेल्या एकूण ६२ मृत्यूंपैकी २७ मृत्यू पुणे शहरातील आहेत. पिंपरी-चिंचवडमधील १९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ११, नगरपालिका क्षेत्रातील ४ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा  समावेश आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. १४) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. १५) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

Breaking : धोनीसोबत सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा​

पुणे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख २२ हजार ३९७  तर  रुग्णांच्या मृत्यूची संख्या २ हजार ९५७ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील  ७९ रुग्णांचा समावेश आहे. 

एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ७२ हजार ५७६, पिंपरी चिंचवडमधील ३४ हजार ४४७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ९ हजार ७३२, नगरपालिका क्षेत्रातील २ हजार ९५४आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रातील २ हजार ६८८ जण आहेत.

गेल्या २४ तासांत २१७६ कोरोनामुक्त  

दरम्यान, गेल्या चोवीस तासांत २ हजार १७६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ९३ हजार ५६५ झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2432 new corona patients found in Pune district on Saturday 15th August 2020