Vidhan Sabha 2019 : पुणे जिल्हयातील 246 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

4 ऑक्टोबरला नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर 5 ऑक्टोबरला त्यांची छाननी करण्यात आली. 6 ऑक्टोबरला रविवार साप्ताहिक सुट्टी असल्याने 7 ऑक्टोबरला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता.​

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघातील 246 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राज्यभरातील एकूण 373 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली होती, त्यापैकी 127 उमेदवारांनी माघार घेतली असून 246 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

विधानसभा मतदार संघनिहाय निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या (कंसात माघार घेतलेल्या उमेदवारांची  संख्या) खालीलप्रमाणे आहे : -

जुन्नर  -11 (1), आंबेगाव 6 (3),  खेड-आळंदी -9 (4),  शिरुर -10 (5), दौंड-13 (4),  इंदापूर-15 (15),  बारामती-10 (2),  पुरंदर – 11 (5), भोर-7 (4),  मावळ-7 (3), चिंचवड-11 (3),  पिंपरी-18 (13),  भोसरी-12 (6),  वडगावशेरी-12 (5), शिवाजीनगर 13 (0), कोथरुड-11 (10),  खडकवासला-7 (2),  पर्वती-11 (4), हडपसर-14 (5),  पुणे कॅन्टोमेंट-28 (30),  कसबा पेठ-10 (3).

No photo description available.

4 ऑक्टोबरला नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर 5 ऑक्टोबरला त्यांची छाननी करण्यात आली. 6 ऑक्टोबरला रविवार साप्ताहिक सुट्टी असल्याने 7 ऑक्टोबरला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी 3 वाजेपर्यंत काही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्जांसोबत निवडणुकींतूनही माघार घेतली. 

याबाबत आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सदर माहिती दिली.

Image may contain: 4 people, people sitting, table, office and indoor

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabah 2019 : पुणे जिल्ह्यात शिवसेनेला फटका; काँग्रेस आघाडीच्या जागा वाढणार?

- Nobel Prize 2019 : पेशींच्या प्राणवायू ग्रहणाबाबतच्या संशोधनाला नोबेल!

- Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात पाच ठिकाणी युतीसमोर बंडखोरांचे आव्हान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 246 candidates in Pune district are finalized for Vidhan Sabha election 2019