corona virus : कोरोनासाठी 25 टक्के रुग्णवाहिका राखीव

25 percent ambulance reserved for Corona patient
25 percent ambulance reserved for Corona patient

पुणे :  कोरोना साथीच्या आजारात रूग्णालये आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) पुरविण्यासाठी बीव्हीजी इंडियाची टीम दिवस-रात्र देशभरात कार्यरत असून, कोरोना रुग्णांसाठी 25 टक्के रुग्णवाहिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बीव्हीजी इंडियाच्या व्यवस्थापन टीमकडून महाराष्ट्र सरकारची डायल 108 टोल फ्री ईएमएस आणि जम्मू काश्मीर सरकारची डायल 108 आणि 102 टोल फ्री सेवा कार्यरत आहे. या संदर्भात बीव्हीजीचे ईएमएस सेवा प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर शेळके म्हणाले, "देशभर साथीचा रोग पसरत चालला आहे. लोकांकडून वेगवेगळे कॉल येत आहेत. केवळ महाराष्ट्रातच आमचे आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी पाच हजारहून अधिक कर्मचारी दिवसरात्र मेहनत करीत आहेत. सरकारच्या निर्देशानुसार आम्ही 25 टक्के ईएमएस रुग्णवाहिका शहर महापालिकांच्या हद्दीत राखीव ठेवल्या आहेत. संशयित रुग्णांना कोरोना रुग्णालयात नेले जाते. तेव्हा प्रोटोकॉलनुसार रूग्णांना निर्जंतुकीकरण केले जाते. आम्ही यासाठी वायसीएम आणि नायडू रुग्णालयाची सुविधा वापरत आहोत. आम्ही आमच्या डॉक्टरांना आणि कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. "

बीव्हीजी इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड म्हणाले, "आमची टीम दिल्लीच्या एम्स ते पुण्याच्या वायसीएम हॉस्पिटलपर्यंत पंधराहून अधिक रुग्णालयांसाठी कार्यरत आहे. जिवाला धोका असूनही कोरोनाबाधित रूग्णांच्या उपचारासाठी कार्यरत आहेत. तसेच, तेथे स्वच्छता राखण्यासाठी कठोर परिश्रम करीत आहेत. आम्ही त्यांना सर्व सुरक्षा साधने उपलब्ध करुन दिली आहेत. "

गायकवाड म्हणाले, "मध्य प्रदेशात आम्ही राज्य सरकारतर्फे डायल १०० टोल फ्री सेवेद्वारे राज्य पोलिसांना मदत करीत आहोत. जवळपास हजार वाहने तेथे बीव्हीजीमार्फत तैनात आहेत."   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com