coronavirus: देशात वीजेच्या मागणीत २५ टक्के घट

electricity
electricity

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशभरातील नागरिकांनी रविवारी (ता.५) रात्री नऊ वाजता वीजपुरवठा बंद करून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद असल्याचे महावितरणकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. देशातील वीजेच्या मागणीत तब्बल ३० हजार मेगावॉटने घट यावेळी झाली. तर महाराष्ट्रात या मागणीत सुमारे साडेतीन हजार मेगावॉटने घट झाली. मात्र रात्री दहानंतर पुन्हा ही मागणी पूर्वपदावर आली. 

सध्या देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि औद्यागिक वीजेचा वापर मोठ्या प्रमाणावर घटला आहे. सध्या देशात १ लाख १४ हजार मेगावॉट एवढीच विजेची मागणी आहे. तर महाराष्ट्रात ही मागणी १३ हजार मेगावॉटपर्यंत घसरली आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांकडून किती प्रतिसाद मिळेल, याचा अंदाज करून या मागणीत दहा टक्‍क्‍यांनी घट होईल, असा प्राथमिक अंदाज महावितरणकडून करण्यात आला होता. 

प्रत्यक्षात मात्र हाती आलेल्या आकडेवारीवरून २५ टक्के मागणीत घट झाल्याचे दिसून आले आहे. रविवारी देशात नऊ वाजण्यापूर्वी एक लाख १४ हजार मेगावॉट विजेची मागणी होती. नऊ वाजता देशभरातील नागरिकांनी वीज बंद केल्यामुळे त्यामध्ये ३० हजार मेगावॉटने घट होऊन ती ८४ हजार मेगावॉटवर आली. मात्र रात्री दहा नंतर पुन्हा ही मागणी १ लाख ३० हजार मेगावॉटपर्यंत गेली. तर महाराष्ट्रात १३ हजार मेगावॉटची मागणी असते. ती ३ हजार ५०० मेगावॉटने कमी होऊन ९ हजार ५०० वर आली. रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास ती मागणी परत १३ हजार मेगावॉटवर गेली, असे प्रयास उर्जागटाचे शंतनू दीक्षित यांनी ‘सकाळ’ शी. बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com