अडीच वर्षाच्या बालकाचा आगीमध्ये होरपळून मृत्यू

राजकुमार थोरात
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

वालचंदनगर (पुणे) : शिरसटवाडी (ता.इंदापूर) येथे  घरगुती गॅस सिलिंडरची गळती होवून लागलेल्या आगीमध्ये अडीच वर्षाच्या चिमुरड्या बालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली.

वालचंदनगर (पुणे) : शिरसटवाडी (ता.इंदापूर) येथे  घरगुती गॅस सिलिंडरची गळती होवून लागलेल्या आगीमध्ये अडीच वर्षाच्या चिमुरड्या बालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली.

या घटनेमध्ये गणेश हनुमंत वाघमारे (वय अडीच वर्षे) या बालकाचा दवाखान्यामध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार  बुधवार (ता. 28) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिरसटवाडी येथे वाघमारे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरची  गळती होवून आग लागल्याची घटना घडली. घरामध्ये अडीच वर्षाच्या गणेश झोपला होता. गणेश आगीमध्ये होरपळा होता. 90 टक्क्यापेक्षाा जास्त भाजल्याने सुरवातीला बारामती व नंतर पुण्यामधील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. आगीमध्ये घरातील धान्य, संसारउपयोगी साहित्य, कपडे जळून 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची खबर उल्हास रामचंद्र वाघमारे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात  दिली असून तपास साहयय्यक फौजदार सी.एन.मुलाणी,प्रवीण वायसे व प्रकाश माने करीत आहेत.

Web Title: 2.5 years old child dies in fire