esakal | पुण्यासाठी २५ हजार कोव्हिशिल्ड लस उपलब्ध; आज लसीकरण केंद्र खुली

बोलून बातमी शोधा

covishild
पुण्यासाठी २५ हजार कोव्हिशिल्ड लस उपलब्ध; आज लसीकरण केंद्र खुली
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील लसीचा साठा पूर्णपणे संपलेला असताना राज्य सरकारकडून बुधवारी रात्री २५ हजार कोव्हिशिल्ड लशींचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे गुरुवारी महापालिकेच्या केंद्रांवर लसीकरण होणार आहे. तसेच, शहरात कोव्हिशिल्डचे दीड हजार व कोव्हॅक्सिनचे सुमारे ७ हजार ५०० डोस उपलब्ध होते. त्यामुळे बुधवारी खासगी व पालिकेच्या केंद्रांवर तीन हजार ७८३ नागरिकांचे लसीकरण झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे महापालिकेला बुधवारी दिवसभरात सरकारकडून लस उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे गुरुवारीही लसीकरण बंद ठेवावे लागेल की काय?, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, बुधवारी रात्री महापालिकेला कोव्हिशिल्ड लशीचे २५ हजार डोस उपलब्ध झाले. त्यानंतर महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय याचे वाटप सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत १५ पैकी १० क्षेत्रीय कार्यालयांना लस वितरित केली आहे. उर्वरित क्षेत्रीय कार्यालयांना सकाळी दिली जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांवरून संबंधित ११० केंद्रांवर लस पुरविली जाईल. त्यामुळे गुरुवारी लसीकरण होणार आहे. तसेच, या २५ हजार लसी फक्त महापालिकेच्या केंद्रांवर पुरविल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, सरकारने आज केवळ २५ हजार कोव्हिशिल्ड लस पुरविली आहे. कोव्हॅक्सिनचा पुरवठा केलेला नाही.

हेही वाचा: दहावीच्या परीक्षेचे शुल्क परत मिळण्याची शक्यता धूसर

बुधवारी झालेले लसीकरण

गट - पहिला डोसा - दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी -३० -१४८

फ्रंटलाइन कर्मचारी - २५२ - १५०

ज्येष्ठ नागरिक - ३३४ - १७७१

४५ ते ५९ वयोगट - ५५२ - ५४६

हेही वाचा: कोविड रुग्णालयांचे युद्धपातळीवर होणार फायर ऑडिट