वारजे, कर्वेनगर परिसरात 258 किलो प्लॅस्टिक जप्त 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे : वारजे, कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने एकूण 258 किलो प्लॅस्टिक जप्त केले. कर्वे रस्त्यावर सुमित्रा हॉटेल ते नाईक पूल परिसरात हॉटेल व्यावसायिक व दुकानदारांवर कारवाई करून 104 किलो; तर प्रभाग क्रमांक 13, निंबाळकर रोड ते करिष्मा सोसायटी परिसरातून 154 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. 

यामध्ये चमचे, ग्लास, स्ट्रॉ, वाटी- 32 किलो, प्लॅस्टिक बॅग्स- 40 किलो, नॉन वोवन पॉलीप्रापीलेन बॅग्स- 3 किलो, प्लॅस्टिक फाइल्स/रोल- 28, थर्मोकोल- 1 किलो आदी माल जप्त करण्यात आला. 

प्रभाग क्रमांक 13, निंबाळकर रोड ते करिष्मा सोसायटी परिसरातही चमचे, ग्लास, स्ट्रॉ, वाटी- 32 किलो, प्लॅस्टिक बॅग्स- 85 किलो, नॉन वोवन पॉलीप्रापीलेन बॅग्स- 37 किलो असे एकूण 154 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. 

वारजे, कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त गणेश सोनुने, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक किरण गुरव, आतिश बोर्डे, फकीर शेख, राहुल शेळके, मुकादम निवदेकर, मोरे, शेंडगे, पाटोले, कदम यांनी ही कारवाई केली.

Web Title: 258 Kg plastic seized in Warje and Karvenagar area in Pune