शाबास, कोरोना युद्धात 'या' वाघिणींची सलग २६ तास झुंज

baramati.jpg
baramati.jpg

बारामती (पुणे) : कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी कोरोना योध्दे जिवावर उदार होऊन काम करीत आहेत. यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लॅबोरेटरीच्या नऊ महिला कोरोना योद्ध्यांनी सलग 26 तास काम करीत विक्रमी वेळेत 60 रुग्णांच्या तपासणीचे अहवाल प्रशासनास देत वेगळा विक्रम केला आहे.

क्षणाचीही उसंत न घेता या सात महिला कोरोना योद्ध्यांनी जी कामगिरी बजावली आहे. त्याचे बारामतीकरांनी कौतुक केले आहे. डॉ. विद्या अर्जुनवाडकर, डॉ. वैशाली डोहे, डॉ. सुजाता कांबळे यांच्यासह तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या रक्षंदा गायकवाड, सुदेशना गायकवाड, अश्विनी काळे, योगिता ढगे, सुप्रिया गायकवाड आणि आरती कदम या नऊ जणींनी रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सलग 60 रुग्णांच्या घशातील द्रवांचे नमुने तपासले. बारामतीकरांच्या सुदैवाने हे सर्वच नमुन निगेटीव्ह आले. मात्र, या सात जणींनी यासाठी घेतलेल्या मेहनतीला बारामतीकरांनी सलाम केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा करुन आरटीपीसीआर (रिअर टाईम रिव्हर्स ट्रान्सस्क्रीप्टेस पॉलिमरेज चेन रिअँक्शन) ही तपासणीची सुविधा वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करुन दिली. या मुळे आता कोरोनाची तपासणी करण्यासाठी नमुने पुण्याला पाठवावे लागत नाहीत. त्यामुळे पुण्याच्या प्रयोगशाळेवरचा ताणही कमी झाला. 

उभे राहिले होते आव्हान....
अचानकच रविवारी बारामतीत पाच कोरोना रुग्ण निष्पन्न झाल्याने त्यांच्या संपर्कातील व इतर असे 60 जणांचे नमुने आल्याने या महिला कोरोना योद्ध्यांसमोर वेळेत त्यांचे अहवाल देण्याचे आव्हान उभे राहिले होते. ही तपासणी करताना बारामतीकर गॅसवर असल्याने वेळेत सगळी कामे करणे गरजेचे होते. 

अशी केली तपासणी....
तपासणी तीन टप्प्यात करावी लागते. यात पहिला टप्पा असतो विघटन म्हणजेच एक्स्ट्रॅक्शनचा...याला तीन तासांचा कालावधी लागतो. त्या नंतर मास्टरमिक्स बनविण्याची प्रक्रीया प्रयोगशाळेत करावी लागते, याला किमान दीड तास लागतात तर शेवटी पीसीआर घेतली जाते, यालाही तीन तास लागतात. याचाच अर्थ एका तपासणीला दहा तासांचा कालावधी लागतो. नऊही जणींनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग 26 तास कार्यरत राहून हे अहवाल वेळेत प्रशासनाला दिले. 

कौतुकास्पद काम....
नऊही महिलांनी कोरोनाचे संकट घोंघावत असतानाही कसलीच पर्वा न करता केलेल्या या कामाचे बारामतीकरांनी मनापासून कौतुक केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com