पुणे-शिरूर महामार्गावरील सलग २६ कि.मी. पुलाच्या प्रस्तावाचे ‘उड्डाण’ कधी?

Pune-to-Shikrapur-Over-Bridge
Pune-to-Shikrapur-Over-Bridge

कोरेगाव भीमा - पुणे-शिरूर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीप्रश्नी कायमस्वरूपी पर्याय व वेगवान प्रवासासाठी पुणे ते शिक्रापूर असा २६ किलोमीटरचा सलग उड्डाणपूल हाच सर्वोत्तम पर्याय ठरू शकणार आहे. मात्र, यासाठीच्या प्रस्तावही सरकारी कामकाजाच्या कोंडीत अडकला आहे. तो मार्गी लावण्याची गरज आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे- नगर रस्ता हा विदर्भ मराठवाडा, या विभागांना पश्‍चिम महाराष्ट्र व मुंबईस जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच पुणे-शिक्रापूर-शिरूर या रस्त्यालगत सणसवाडी, रांजणगाव गणपती येथे औद्योगिकीकरण झालेले असल्याने या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. सद्यःस्थितीत पुणे ते शिक्रापूर रस्त्यावर पुणे महानगरपालिका हद्दीपर्यंत आठ पदरी रस्ता तर त्यापुढे शिक्रापूर-मलठण फाटा पर्यंत चौपदरी रस्ता अस्तित्वात आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे ते शिक्रापूर दरम्यान २६ किलोमीटर अंतराच्या सलग उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केला असून त्याचा अंदाजित खर्च २९०० कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे.

यापूर्वीही दिला होता प्रस्ताव
आमदार अशोक पवार यांच्या कार्यकाळात यापूर्वीही अशाच प्रकारे सुमारे अडीच हजार कोटींच्या सलग उड्डाणपुलाच्या निर्माणाचा प्रस्ताव दिला गेला होता. मात्र, बीओटी तत्त्वावरील हा प्रस्ताव त्यावेळी भविष्यात वाढणाऱ्या अवाढव्य टोलच्या किमतीवरून थांबला होता. त्या वेळी अडीच हजार कोटींचा असलेला प्रस्ताव आता सुमारे २९०० कोटीवर गेला आहे.

असे आहेत पर्याय
पुणे ते शिक्रापूर महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करावा व त्यामधून कार, जीप अथवा बस अशी हलकी वाहने वगळून इतर व्यावसायिक अवजड वाहनांकरिता पथकर लावण्यात यावा. 
पुणे-शिरूर रस्त्यावरील पुढील १० वर्षांच्या पथकर वसुलीचे अधिकार उद्योजकास देऊन त्या माध्यमातून निधी उभारणी करून महामार्ग सुधारणीचे व उड्डाण पुलाचे काम हाती घ्यावे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com