Vidhan Sabha 2019 : एकाच कुटुंबातील 26 जणांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

पिंपरी : थेरगाव, डांगे चौक, आनंद पार्क येथील एकाच कुटुंबातील 26 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत चुरशीचे वातावरण असल्याने चव्हाण कुटुंबियाकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागून होते. थेरगाव मतदान केंद्रामधील शाळांमध्ये या सर्व मतदारांचे मतदान एकाच दिवशी पार पडले. विभक्त कुटुंब पद्धतीत समाजाला धडा देण्याचे काम हे कुटुंब करत आहे. 

Vidhan Sabha 2019 :  पिंपरी : थेरगाव, डांगे चौक, आनंद पार्क येथील एकाच कुटुंबातील 26 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत चुरशीचे वातावरण असल्याने चव्हाण कुटुंबियाकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागून होते. थेरगाव मतदान केंद्रामधील शाळांमध्ये या सर्व मतदारांचे मतदान एकाच दिवशी पार पडले. विभक्त कुटुंब पद्धतीत समाजाला धडा देण्याचे काम हे कुटुंब करत आहे. 

35 वर्षांपासून हे कुटुंब थेरगावमध्ये राहत असून एकूण 35 सदस्य कुटुंबात आहेत. त्यापैकी 26 जणांनी मतदान केले. पहिल्या पिढीतील मल्हारी चव्हाण ( पाच भावंडाचे वडील ) पंरपरागत बैलगाडी बनविण्याचा व्यवसाय करीत असत. 1971 साली दुसऱ्या पिढीतील राजाराम चव्हाण ( मल्हारी चव्हाण यांचा मुलगा) व्यवसायासाठी थेरगाव येथेच स्थायिक झाले. राजाराम मल्हारी चव्हाण व त्यांच्या पत्नी शंकुतला राजाराम चव्हाण ही दूसरी पिढी आहे. सध्या राजाराम व शंकुतला चव्हाण हयात नाहीत. त्यांना एकूण पाच मुले आहेत. ही तिसरी पिढी. राजाराम चव्हाण यांच्या मुलांमध्ये (तीसऱ्या पिढीतील) पहिला मुलगा हनुमंत आणि पत्नी छाया, दूसरे बाळासाहेब आणि उषा, तिसरे शामराव आणि अरूणा, चौथे नंदकुमार आणि संगीता व शेवट नंबरचे रमेश आणि वनश्री. चौथ्या पिढीत मुले एकूण दहा आहेत आणि एकूण सुना सात आहेत. बाकींच्या विवाह बाकी असून उर्वरीत सर्व नातवंडे असा एकूण परिवार आहे. 
 
परिस्थिती पहिल्यापासूनच हालाखीची होती. त्यामुळे मतदानाचे एवढे गांभीर्य नव्हते. वडील जाऊन खूप वर्ष लोटली. मात्र मुलांनी एकत्र कुटुंब पद्धती जोपासली आहे. व्यवसायात ही सर्वजण प्रगत आहेत. सहा गुंठे जागेत सर्वजण राहतात. सर्व नातवंडे सध्या शिक्षण घेत आहेत. 
- रमेश चव्हाण, व्यावसायिक, दुसऱ्या पिढीतील मुलगा, थेरगाव 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 members of the same family voted In Maharashtra Vidhan sabha