पुणे जिल्ह्यातील पुरंदरला भूकंपाचा धक्का; दिव्यापासून - सासवडपर्यंत दीड तास वीजपुरवठा खंडित

श्रीकृष्‍ण नेवसे
Wednesday, 27 January 2021

पुरंदर तालुक्यातील सोनोरी, वनपुरी, दिवे आदी गावे आणि परिसरात काल (ता. 26)  रात्री साडेसातच्या दरम्यान भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाबाबत पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रूपाली सरनौबत यांनी संबंधित शासकीय माहितीच्या आधारे आज सकाळी दुजोरा दिला.

पुणे : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर जवळ रात्री 7.28 वाजता भुंकपाचे तीव्र झटका बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.6 एवढी दिसत आहे.  नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी मार्फत ही माहिती दिली जात आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा कोणतेही नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही.  

 

पुरंदर तालुक्यातील सोनोरी, वनपुरी, दिवे आदी गावे आणि परिसरात काल (ता. 26)  रात्री साडेसातच्या दरम्यान भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाबाबत पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रूपाली सरनौबत यांनी संबंधित शासकीय माहितीच्या आधारे आज सकाळी दुजोरा दिला.

IMF ची भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज', चीनलाही टाकणार मागे
 

दिवे सोनोरी आणि परिसरात स्फोट झाल्याप्रमाणे आवाज आल्याने लोक भयभीत होऊन घराबाहेर पडले. प्राप्त माहितीनुसार जीवितहानी किंवा गंभीर नुकसान झाले नाही. मात्र भुकंपाच्या धक्क्याने पत्रे, मोकळी भांडी, वस्तुला कंपने आल्याचे जाणवल्याचे सोनेरीचे गिरीश काळे, दिव्याचे शंकर झेंडे यांनी सांगितले.

भुकंपाने दिव्यापासून सासवडपर्यंतचा वीजपुरवठा दीड तास खंडित झाला होता.

Farmer Protest : अमेरिकेत भारतीय दुतावासाबाहेर फडकावले खलिस्तानी झेंडे

 

 No photo description available.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2.6 Richter scale Earthquake near Purandar in Pune district Maharashtra