‘सीओईपी’ला पिंपरीत २७ एकर जागा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

भोसरी - पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक विस्तारासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील २७ एकर जागा उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी नवलकिशोर राव यांनी घेतला आहे. त्यामुळे ‘उद्योगनगरीत’ ‘सीओईपी’सारख्या शासकीय दर्जेदार शिक्षण संस्थेची शाखा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. 

मौजे चिखलीतील गट क्रमांक ५३९ मधील जमीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे संस्थेला शैक्षणिक विस्तारासाठी द्यावी, अशी विनंती कॉलेज प्रशासनाने सरकारकडे केली होती. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग व वित्त विभाग यांनी दिलेल्या अभिप्रायाच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ३८ व ४० मधील तरतुदीनुसार, तसेच महाराष्ट्र जमीन महसूल नियम, १९७१ च्या कलम ५, ६ व ८ मधील तरतुदीनुसार अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या शैक्षणिक संस्थेच्या विस्ताराकरिता सर्व्हे क्रमांक ५३९ मधील पेठ क्रमांक १४ मधील ११.३० हे.आर. क्षेत्र महसूलमुक्‍त किमतीने कब्जेहक्काने अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या संस्थेस शैक्षणिक विस्तारासाठी नाममात्र १ रुपया या दराने ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राव यांनी दिले आहेत.

Web Title: 27 Acre Place for COEP