इंदापूर तालुक्यासाठी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर - प्रवीण माने

राजकुमार थोरात
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील पाच गावातील बंदिस्त गटार योजना, अतंर्गत गटार योजना व सभागृह बांधण्यासाठी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील पवारवाडी येथील बंदिस्त गटार योजनेसाठी सात लाख रुपये, रुई, माळवाडी व तरंगवाडी येथील अंतर्गत गटार योजनेसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये, भरणेवाडी येथील धापटेवस्ती येथे सभागृह बांधण्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांच्या सहकार्याने २७ लाख रुपयांचा निधी इंदापूर तालुक्यासाठी मिळाला असून झेडपीच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्याचा सर्वांगिण  विकास करण्यासाठी जास्तीजास्त निधी आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे माने यांनी सांगितले.
 
Web Title: 27 lack fund confirm for indapur tal said by pravin mane