सराईत मोबाईल चोरट्यांना अटक; 27 मोबाईल जप्त 

27 mobile phones seized  by thief in pimpri
27 mobile phones seized by thief in pimpri

पिंपरी : दुचाकीवरून येवून मोबाईल हिसकाविणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून 27 मोबाईल जप्त केले आहेत. शुभम शिवाजी कदम (वय 19, रा. रूपी हौसिंग सोसायटी, रूपीनगर, तळवडे), आनंद अर्जुन डोळसे (वय 19, दोघेही रा. रूपीनगर, तळवडे) अशी आरोपींची नावे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
शनिवारी (ता.7) काळेवाडी परिसरातील धनगरबाबा चौक येथे (एम.एच. 14, एच.आर. 1135) या क्रमांकाच्या दुचाकीवर थांबलेल्या दोघांकडे चोरीचे मोबाईल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे सखोल तपास केला असता विविध नामांकित कंपन्यांचे 27 मोबाईल आढळले.

Video : अजित पवार हात जोडून करताहेत नमस्कार; कारण...
पोलिसांनी ते मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण दोन लाख 11 हजारांचा माल जप्त केला. या कारवाईत वाकड, निगडी, भोसरी, पिंपरी, चिंचवड या पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण मोबाईल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. तर उर्वरित 22 मोबाईलबाबत तपास सुरू असून हे मोबाईलही चोरट्यांनी पिंपरी-चिंचवड शहर परिसरातूनच चोरलेले आहेत. तरी या परिसरातून मोबाईल चोरीला गेलेल्या नागरिकांनी डांगे चौकातील गुन्हे शाखा युनिट चारच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. हे दोन्ही गुन्हेगार रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर निगडी, भोसरी, पिंपरी, चिंचवड, चिखली, भोसरी एमआयडीसी या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
 
पुणे : चुलत भावाच्या लग्नाला बोलावले नाही म्हणून.... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com