
रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत २७ वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू...
निरगुडसर : आई व बहिणीला भेटून घरी येत असताना रुग्णवाहीकेने दिलेल्या जोरदार धडकेत २७ वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना सोमवार ता.९ रोजी रात्री ८ ते ८:३० च्या दरम्यान पुणे नाशिक हायवे रोडवर घडली आहे. या अपघातात काजल किशोर टाव्हरे ( वय २७, रा.निरगुडसर , ता.आंबेगाव पुणे ) हिचा मृत्यू झाला आहे. या बाबत शिवाजी राजू शिंदे वय ३९ रा.वारूळवाडी ,ता.जुन्नर पुणे ) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर अपघातास कारणीभूत ठरलेला रुग्णवाहिका चालक रमेश सुखदेव पानसरे ( रा. वैद्य वाडा बुधवार पेठ जुन्नर ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की काजल टाव्हरे या सोमवार दुचाकी स्कुटी एम एच १४ एफ डब्लू ४९३४ घेऊन वारूळवाडी ता.जुन्नर येथे बहिणीला भेटायला गेली होती. बहिणीला भेटून त्या निरगुडसर येथे घरी निघाल्या असताना पुणे नाशिक हायवे रोडवर हॉटेल निलायम समोर काजल टाव्हरे यांच्या स्कुटीला नारायणगाव बाजूकडून मंचर बाजूकडे जात असणाऱ्या रुग्णवाहिका एम.एच १४, सी. एल.०८२० या रुग्णवाहिकेचे जोरदार धडक दिली या धडकेत काजल टाव्हरे या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्या उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहे.
Web Title: 27 Year Old Married Woman Dies In Ambulance Crash
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..