अमरनाथ यात्रेसाठी जुन्नरहून 270 भाविक रवाना

दत्ता म्हसकर
मंगळवार, 3 जुलै 2018

जुन्नर (पुणे) : अमरनाथ सेवा मंडळ जुन्नरच्या वतीने यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी 270 भाविकांची नोंदणी करण्यात आली होती. या यात्रेचा जुन्नर शहरातील चौथा व शेवटचा समुह सोमवारी (ता.2) समारंभपूर्वक रवाना झाला.

गेली 19 वर्षे अमरनाथ यात्रेचे आयोजन अमरनाथ सेवा मंडळ जुन्नर शहरा मार्फत गेली 19 वर्षांपासून करण्यात येत आहे. या यात्रेकरिता नोंदणी केलेल्या 270 जणांपैकी जुन्नरहून चारचाकी वाहनाने 190 जण रवाना झाले असून 50 जण आळेफाटा येथून जाणार आहेत, तर 30 भाविक विमानाने जात असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी सांगितले.

यात्रेच्या चौथ्या समुहात काल सचिन कालेकर, संचित गुंजाळ, बुवा वाघमारे, समीर मुलाणी, पुष्कराज जंगम, दिनेश दुबे , विजु ताथेड, सतिश कर्पे, हितेश शहा, अमर कुकरेचा, सागर गरिबे शिवा खत्री, भाऊ कुंभार, राजु शिंगोटे, संतोष शिंगोटे, मंगेश थोरात, रावळ सर, आदी यात्रेकरू सहभागी झाले. 

यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी अनिल जोगळेकर, रमेश कर्पे राजु जुंदरे, मधुकर काजळे, मंड़ळाचे अध्यक्ष रामभाऊ मिरगुंड़े, सेक्रेटरी प्रदिप होगे, खजिनदार ह्रषिकेश जोगळेकर, कृष्णा ड़ोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मंड़ळाचे कार्याध्यक्ष नरेंद्रभाऊ तांबोळी यांनी केले. 

Web Title: 270 devotees goes to amarnath yatra from junnar

टॅग्स