टेमघरला 28 मिलिमीटर पाऊस

टेमघरला 28 मिलिमीटर पाऊस

खडकवासला - राज्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेध शाळेने दिला होता. परंतु, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार ही धरणापैकी टेमघर वगळता मात्र पावसाचा जोर कमी असल्याचे दिसून आले. गुरुवारी सकाळी सहा वाजता मागील 24 तासात टेमघर येथे सर्वात जास्त 28 मिलिमीटर, पानशेत व वरसगाव येथे आठ मिलीमीटर खडकवासला येथे पाऊस पडलाच नाही.

पानशेत धरण यंदा शंभर टक्के भरले असून त्या धरणात सध्या 99.71 टक्के पाणी साठा जमा झालेले आहे.  या धरणातून सध्या वीज निर्मितीसाठी 614 क्यूसेक पाणी सोडण्यात आलेले आहे. 

टेमघर धरण दुरुस्तीच्या कारणास्तव जर पूर्ण क्षमतेने भरता येत नाही. आज गुरुवारी या धरणात 70.85 टक्केवारी टक्के भरलेले आहे. या धरणातून ६०० क्यूसेक विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आलेला आहे. अशाप्रकारे खडकवासला धरणात 1214 क्यूसेक्स पाणी थेट जमा होत आहे तर खडकवसला धरणातून 1355 क्युसेक्स पाणी कालव्यात तर बंद जलवाहिनीतून 288 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. 

वरसगाव धरण 75.99 टक्के भरले आहे. या धरणात 9.74 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. तर चार ही धरणात मिळून 24.96 टीएमसी म्हणजे 85.62 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com